RBI FD Rules : एफडीचे नियम बदलणार! आरबीआयचा मोठा निर्णय; आता 'या' एका चुकीमुळे तुमचे नुकसान होणार नाही

Fixed Deposit Rules 2026 : १ ऑक्टोबर २०२६ पासून RBI चे नवीन एफडी नियम लागू होणार आहेत. समान एफडीवर सर्व शाखांमध्ये समान व्याजदर, वेबसाइटवर व्याजदर जाहीर करणे आणि गुंतवणूकदारांना अधिक पारदर्शकता मिळणार आहे.
RBI FD Rules
RBI FD RulesMeta ai
Published On

तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने डिपॉझिटवरच्या व्याजदरांबद्दल नवीन नियम जाहीर केले असून ते १ ऑक्टोबर २०२६ पासून देशातल्या सर्व व्यावसायिक बँका, स्मॉल फायनान्स बँका,प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB), लोकल एरिया बँका, पेमेंट बँका आणि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये लागू होणार आहेत.

नव्या नियमांनुसार, एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये समान प्रकारच्या आणि समान रकमेच्या फिक्स्ड डिपॉझिटवर वेगवेगळे व्याजदर देण्याची पद्धत बंद होणार आहे. म्हणजेच , एखाद्या ग्राहकाने एकाच दिवशी त्या बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये समान कालावधीसाठी एफडी केली, तर त्याला सर्व शाखांमध्ये समान व्याजदर मिळेल. त्यामुळे शाखेनुसार व्याजदर बदलण्याची शक्यता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर ग्राहकांना आणखी चांगल्या पद्धतीने सेवा मिळेल.

RBI FD Rules
LPG Gas KYC Update : १० दिवसात e-KYC करा, अन्यथा सिलिंडर दुपट्टी दराने करावा लागेल खरेदी, वाचा नियम

आरबीआयने बँकांना त्यांच्या सर्व डिपॉझिटवरच्या व्याजांची माहिती आधीच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करणंही बंधनकारक केलं आहे. त्यामुळे ग्राहकांना एफडी करण्याआधीच विविध कालावधींसाठी उपलब्ध व्याजदर सहज पाहता येतील आणि वेगवेगळ्या बँकांची तुलना करणं जास्त सोपं होईल.

याशिवाय, बल्क डिपॉझिटसाठीही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत, आणि जास्तीत जास्त १०.१० वाजेपर्यंत, बँकांना त्यांच्या वेबसाइटवर बल्क डिपॉझिटचे अपडेट व्याजदर प्रसिद्ध करावे लागतील. तसेच लिक्विडिटी कव्हरेज रेशिओ (LCR) लक्षात घेऊन बँकांना बल्क डिपॉझिट आणि रुपयांमधले NRI डिपॉझिटसाठी स्वतंत्र व्याजदर ठरवण्याची मुभा देण्यात आली आहे.

RBI FD Rules
DA Hike: दिवाळीपूर्वी पुन्हा वाढणार महागाई भत्ता? कर्मचाऱ्यांना मिळाले पगारवाढीचे हे संकेत

महत्त्वाची बाब म्हणजे, १ ऑक्टोबरपासून एफडीचे व्याजदर आपोआप वाढणार किंवा कमी होणार नाहीत. आरबीआयने फक्त नियमांमध्ये बदल केला आहे. भविष्यातही प्रत्येक बँक आपल्या निधीची गरज, बाजारातली परिस्थिती आणि फंडिंग कॉस्ट यानुसार व्याजदर निश्चित करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com