Railway IRCTC Share : रेल्वेची मोठी घोषणा अन् शेअरमध्ये अचानक झाली पडझड; नेमकं काय घडलं?

Railway IRCTC Share update : रेल्वेने मोठी घोषणा केल्यानंतर IRCTCच्या शेअरमध्ये पडझड झाली. त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला.
Railway Recruitment 2024
Railway Recruitment 2024Saam Tv
Published On

नवी दिल्ली : सरकारी कंपनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म लिमिटेडचे शेअर गुरुवारी ३ टक्क्यांनी घसरले. कंपनीचा शेअर इंड्रा डेमध्ये ८६३.४५ रुपयांपर्यंत आला होता. रेल्वेच्या शेअर घसरणीला त्यांची घोषणा जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.

Railway Recruitment 2024
Railway Jobs: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; १९० रिक्त पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

इंडियन रेल्वे ट्रेनच्या तिकीटासाठी आगाऊ तिकीट बुकिंग कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवस केला आहे. रेल्वेने बदलेला नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, एक नोव्हेंबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगच्या कालावधीमध्ये मोठा बदला केला आहे. १२० दिवसांचा तिकीट बुकिंग कालावधी हा ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार आहे. आयआरसीटीसी ८० ते ८५ टक्के कमाई ई-तिकीटमधून करते.

शेअर बाजारातील तज्ञ्जांचं म्हणणं आहे की, 'तिकीट बुकिंगचा कालावधी कमी केल्याने तिकीट रद्द करण्याचे प्रकरण कमी येतील. मात्र, या निर्णयाचा परिणाम आयआरटीसीवर होऊ शकतो. कंपनीच्या तिमाही आकड्यावर नजर टाकली तर लक्षात येईल की, जूनच्या तिमाहीत आयआरसीटीसीच्या कमाईत ३३ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळत आहे. तर वार्षिक कमाई ११.८ टक्क्यांनी वाढून १,१२०.२ कोटी रुपये झाली आहे.

Railway Recruitment 2024
Ticket Reservation : प्रवाशांसाठी दिवाळीचं मोठं गिफ्ट; रिजर्वेशनसाठी फक्त ६० दिवस आधी तिकीट बूक करता येणार

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात शेअर होल्डिंग पॅटर्नच्या आधारावर सरकारकडे ६२.४० टक्के हिस्सा आहे. आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये २ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. तसेच स्पर्धक कंपनीच्या कमाईच्या तुलनेत आयआरसीटीसीने चांगलं प्रदर्शन केलं नाही. कंपनीटे शेअर ५२ आठवड्यांच्या उचांक शेअरची किंमत ११४८.३० रुपये इतकी आहे. तर ५२ आठवड्यांचा निचांक ६३६.१० रुपये इतकी आहे. त्यांचं मार्केट कॅप ६९,७६८ कोटी रुपये आहे. अचानक शेअर घसरल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com