भारतीय रेल्वेने तिकीट बुकींगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता १२० दिवसांऐवजी फक्त ६० दिवसांत तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे. गुरुवारी (17 ऑक्टोबर) याचं नोटिफिकेशन समोर आलं आहे. यात असं सांगण्यात आलं आहे की, रिजर्वेशनसाठी लागणारा जास्तीचा वेळ कमी करून थेट ६० दिवसांचा करण्यात आला आहे.
रेल्वेने नोटीफिकेशनमध्ये पुढे असंही सांगितलं आहे की, १ नोव्हेंबरपासून रेल्वेचा तिकीट बूक करण्यासाठीचा कालावधी कमी करण्यात येत आहे. कितीट झटपट बूक होत नसल्याने प्रवाशांना बरेच दिवस वाट पाहत राहावी लागत होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेता शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
अशात आतापर्यंत अनेक व्यक्तींनी तिकीट बूक केले आहे. ज्या व्यक्तींनी नोव्हेंबर महिन्यासाठी आताच तिकीट बूक केलं आहे त्याचं काय होणार असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. तर ARP अंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत झालेल्या सर्व बुकींग आहेत तशा सुरू राहतील. तसेच हा नवा नियम नोव्हेंबरपासून सुरू होईल.
आतापर्यंत व्यक्तींना तिकीट बुक करण्यासाठी १२० दिवसांचा कालावधी मिळत होता. मात्र आता हा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे अनघ्या ६० दिवसांत तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू तुम्हाला खरेदी कराव्या लागणार आहेत. फक्त ६० दिवस वाट पहावी लागणार असल्याने अचनाक तिकीट बूक करायचं ठरलं तर बुकींसाठी एकाचवेळी मोठी गर्दी निर्माण होइल.
प्रवाशांना तिकीट सहज आणि झटपट मिळावं यासाठी रेल्वेकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी तिकीट बुकींगमध्ये सतत बदल होत आहे. तिकीट बुकींची पद्धत आणि नियम यात बदल करण्यात येत आहे.
काही ठिकाणी लोकल आणि एसी ट्रेनमध्ये स्कॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये गेलात तरीही स्कॅन करून तुमचं तिकीट तुम्ही काढू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.