पालघरमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवर परिणाम झाला आहे. या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. याचसोबत लोकलसेवेवर देखील परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसाने पालघरला झोडपून काढले. पालघर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. वानगाव रेल्वे स्थानकावर पहाटे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. पालघर येथे काही काळ सिग्नल देखील फेल झालं होतं, तर केळवे रेल्वे स्थानक परिसरात देखील रेल्वे रुळावर पाणी आले होते.
पालघरमध्ये पहाटेपासून पाऊस थांबला असून ट्रॅकवरील पाणी आता ओसरले आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड देखील दुरूस्त झाला आहे. सध्या रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. पण उशिराने सुरू आहे. यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. त्याचसोबत लोकलसेवा देखील उशिराने सुरू आहे. सध्या मुंबईकडे जाणारी लोकलसेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे पालघर, वसई, विरार याठिकाणावरून मुंबईमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना उशिर झाल्यामुळे लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.