Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणवरून कसाऱ्याकडे जाणारी लोकलसेवा ठप्प

Kalyan To Kasara Local Service: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
Central Railway News
Central Railway NewsSaam Tv
Published On

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. टिटवाळा स्थानकाजवळ गितांजली एक्स्प्रेस खूप वेळ थांबली. या एक्स्प्रेसमध्ये चैन पुलिंग करण्यात आल्यामुळे ट्रेन थांबली होती. त्यामुळे कल्याणवरून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान गितांजली एक्स्प्रेसमध्ये चैन पुलिंग झाले. त्यामुळे तपासणीसाठी ट्रेन बराच वेळ एकाच ठिकाणी थांबली. यामुळे कल्याणवरून कसाऱ्याच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर परिणाम झाला.

२५ मिनिटांनंतर गीतांजली एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यमुळे प्रवाशांचे हाल होत आहे. कल्याणवरून कसाऱ्याच्या दिशेने जाणारे रेल्वे प्रवासी खोळंबले आहे. परिणामी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

Central Railway News
Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खूशखबर! १५ डब्यांची लोकल धावणार, कधी आणि कुठे? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com