मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दादरवरून कर्जत आणि कसारा मार्गावर जलद लोकल सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून कर्जत आणि कसाऱ्याकडे प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये ५ ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबरपासून २० लोकल सीएसएमटीऐवजी दादरवरून सोडण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २० जलद लोकल फेऱ्या आता दादरवरून धावणार आहेत. सीएसएमटी आणि दादर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे या गर्दीचा सर्वभार लोकलवर पडत आहे. गर्दी असल्यामुळे प्रवाशांना कामाला जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासावेळी घरी जाण्यासाठी उशिर होतो.
त्याचसोबत त्यांना दररोज गर्दीमधून धक्के खात प्रवास करावा लागतो. अनेकदा गर्दी असल्यामुळे लोकलमध्ये चढता येत नसल्याने त्यांना लोकल सोडावी लागते. त्यामुळे त्यांचे प्रवासादरम्यान प्रचंड हाल होते. बऱ्यचदा दूरचा प्रवास असल्यामुळे जागा मिळावी यासाठी अनेक प्रवासी हे दादर आणि भायखळ्यावरून सीएसएमटी गाठून परत कल्याण आणि कसाऱ्याच्या दिशेने प्रवास करतात. महत्वाचे म्हणजे, सीएसएमटीवरून २५४ लोकल धावतात. त्यामधील अनेक लोकल पुरेसे फलाट नसल्यामुळे उशिरा धावतात. तसेच सिग्नलमुळे देखील लोकल बऱ्याच वेळ थांबतात.
आता याच समस्येचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून निराकरण करण्यात आले आहे. या ५ ऑक्टोबरपासून २० जलद लोकल दादरवरून धावणार आहेत. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढतील, वक्तशीरपणा सुधारेल, प्रवाशांचे हाल होणार नाही. यासाठी दादरच्या फलाट क्रमांक ८ चे रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. तर फलाट क्रमांक १०-११ चे डबल डिस्चार्ज फलाटात रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकलच्या पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूने चढता येणार आहे. दादरवरूनच आता जलद लोकल सुटणार असल्यामुळे कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड आनंद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.