Investment Plan : PPF की सुकन्या समृद्धी? ₹5,000च्या गुंतवणुकीचा असा आहे संपूर्ण हिशोब, फरक पाहून व्हाल थक्क!

PPF vs SSY : दर महिन्याला ५००० रुपये गुंतवल्याने PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत किती रक्कम मिळेल? दोन्ही योजनांचे व्याजदर, मुदत, परतावा आणि पैसे काढण्याचे नियम जाणून घ्या.
PPF investment
PPF investmentmeta ai
Published On

मुलीच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा भविष्यातल्या आर्थिक गरजांसाठी बचत करताना योग्य गुंतवणूक पर्याय निवडणं महत्त्वाचं असतं. सरकारच्या पाठिंब्याच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) या दोन्ही लोकप्रिय बचत योजना आहेत. मात्र व्याजदर, पात्रता, मुदत आणि पैसे काढण्याचे नियम यामध्ये मोठा फरक आहे.

सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

१० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने SSY खातं उघडता. येते. या योजनेचा सध्याचा व्याजदर ८.२ टक्के आहे. खात्याची मुदत २१ वर्षांची असून सुरुवातीच्या १५ वर्षांपर्यंतच पैसे जमा करावे लागतात.

PPF investment
Bank Holidays 2026: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँकांना सुट्ट्या, वाचा संपूर्ण यादी

मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मागच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात असलेल्या रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. काही ठराविक परिस्थितीत खातं मुदतीआधी बंद करण्याचीही तरतूद आहे.

PPF investment
LPG Price Today: पुन्हा सिलेंडर स्वस्त झाला की ग्राहकांची निराशा? आजचे नवे रेट आले समोर

PPF मध्ये किती फायदा?

PPF वर सध्या ७.१ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेची मूळ मुदत १५ वर्षांची असते. त्यानंतर ती ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवता येते. ठराविक अटी पूर्ण केल्यावर PPF मधून आंशिक पैसे काढणे किंवा कर्ज घेण्याची सुविधा मिळते.

दरमहा ₹५००० गुंतवल्याने किती रक्कम मिळेल?

दरमहा ₹५००० म्हणजे वर्षाला ₹६०,००० आणि १५ वर्षांत एकूण ₹९ लाखांची गुंतवणूक होते.

PPF: ७.१ % दर गृहीत धरलं तर १५ वर्षांनंतर सुमारे ₹१६.२७ लाख मिळू शकतात.

SSY: ८.२% दर गृहीत धरल्यास १५ वर्षांत ₹९ लाख जमा होतील. त्यानंतर आणखी ६ वर्षे व्याज मिळत राहिल्याने २१ वर्षांच्या मुदतीवर रक्कम सुमारे ₹२७.७ लाखांपेक्षा जास्त होऊ शकते.

PPF की SSY?

मुलीच्या भविष्यासाठी स्वतंत्र आणि दीर्घकालीन निधी तयार करायचा असेल तर SSY जास्त आकर्षक ठरू शकते. मात्र गुंतवणुकीत तुलनेपेक्षा जास्त लवचिकता हवी असल्यास PPF उपयोगी पर्याय आहे.

महत्त्वाचे : वरील गणना सध्याचे व्याजदर संपूर्ण कालावधीत कायम राहतील असे गृहीत धरून केलेली आहे. प्रत्यक्ष परतावा भविष्यातील व्याजदर आणि लागू नियमांनुसार बदलू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत नियम तपासणे आणि आवश्यक असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com