PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता अडकणार नाही ना? पैसे मिळण्याआधी शेतकऱ्यांनी ‘या’ 6 गोष्टी तपासाच!

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. हप्ता अडकू नये म्हणून शेतकऱ्यांनी e-KYC, आधार, बँक खातं, जमीन रेकॉर्ड आणि लाभार्थी स्टेटस तपासावे.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanameta ai
Published On

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. पण केंद्र सरकारने अजून २४ वा २००० रुपयांचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होणार, याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा एखाद्या ठराविक तारखेला पैसे मिळणार असल्याचं सोशल मीडियावरचे दावे अधिकृत माहितीशिवाय खरे मानू नयेत.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एकाच वेळी न देता २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक हप्त्यामध्ये साधारण चार महिन्यांचे अंतर असते.

PM Kisan Yojana
Online Shopping Charges : ऑनलाइन वस्तू मागवण्याआधी हे वाचा! सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्ज वाढणार

हप्ता अडकू नये म्हणून या ६ गोष्टी तपासा

१. ekyc पूर्ण करा, कारण त्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही.

२. बँक खात्याच्या क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती अचूक आहे का, हे तपासा.

३. आधरारची माहिती तपासा. तसेच कोणतीही अचूक माहिती नसेल याची काळजी घ्या.

PM Kisan Yojana
Gold Price Today: सोनं पुन्हा झालं स्वस्त! ३ दिवसांत मोठी घसरण, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

४. जमिनीचे रेकॉर्ड तपासून घ्या. त्यामध्ये नोंद असलेली जमीन आणि संबंधित माहिती योग्य आहे का, हे तपासा.

५. मागचा २३ वा २००० रुपयांचा हप्ता खात्यात जमा झाला आहे का, हे तपासा.

६. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का आणि Beneficiary Status सक्रिय आहे का, हे नक्की तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com