accident
car accident Saam Tv News

पीएम राहत योजना: रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मिळणार कॅशलेस उपचार

PM Relief Scheme Cashless : केंद्र सरकारने रस्ते अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान मदत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जखमींना ₹१.५ लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळतील.
Published on
Summary
  • केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना

  • जखमींना ₹1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार सुविधा

  • दरवर्षी लाखो अपघात आणि मृत्यू रोखण्याचा प्रयत्न

भारतात दरवर्षी साडेचार लाखांहून अधिक रस्ते अपघात होतात. दररोज १,२६४ ते १५०० रस्ते अपघात होत असतात. या अपघातात लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. बहुतेकवेळा अपघातात जखमी झालेल्यांना वेळेवर उपचार मिळत नसल्यानं त्यांना जीव गमवावा लागतो. आता तसे होणार नाही, कारण सरकार कॅशलेसची सुविधा पुरवणार आहे, त्यामुळे अनेकांचा जीव वाचणार आहे.

accident
Ajit Pawar Plane Crash: VSR कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

केंद्र सरकारने शनिवारी पंतप्रधान मदत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या अंतर्गत रस्ते अपघातात पीडितांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान केली जाईल. ही योजना रस्ते अपघातातील पीडितांसाठी रामबाण उपाय ठरणार आहे. जखमींना १.५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार दिला जाईल. ही योजनेची घोषणा करताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटलंय की, भारतात दरवर्षी रस्ते अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. वेळेवर वैद्यकीय मदत देऊन यापैकी अनेकांचे प्राण वाचवता येऊ

accident
Ajit Pawar Accident Video : अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवीन व्हिडिओ समोर, पाहा Video

जर जखमींना पहिल्या तासात रुग्णालयात दाखल केले तर रस्ते अपघातातील सुमारे ५० टक्के मृत्यू टाळता येतात, असं एका अभ्यासातून समोर आलंय. पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ येथे हलवल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मदत योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत, रस्ते अपघातातील पीडितांना ₹१.५ लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत.

रस्ते अपघातानंतर त्वरित वैद्यकीय मदत न मिळाल्याने कोणालाही जीव गमावू लागू नये यासाठी सरकारची वचनबद्धता या निर्णयातून अधोरेखित होते, असे मंत्रालयाने म्हटले आहे. हेल्पलाइन नंबर ११२ च्या आपत्कालीन मदत प्रणालीमुळे अपघातग्रस्तांना सुवर्ण वेळेत रुग्णालयात पोहोचता येते याची खात्री होते. रस्ते अपघातातील बळी, पादचारी किंवा घटनास्थळी उपस्थित असलेले कोणीही ११२ वर डायल करून जवळच्या नियुक्त रुग्णालयाची माहिती मिळवू शकतात आणि रुग्णवाहिकेची मदत मागू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com