PM Modi: पीएम मोदींचं शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट! शेतकऱ्यांसाठी लाँच केल्या ३५,४४० कोटींच्या योजना

PM Modi Launch 2 Government Schemes For Farmer: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी दोन योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे दलहन आत्मनिर्भर योजना आणि पीएम धन धान्य कृषी योजना.
PM Modi Launch 2 Government Schemes
PM Modi Launch 2 Government SchemesSaam Tv
Published On
Summary

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी लाँच केल्या योजना

दलहन आत्मनिर्भरता मिशन

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शेतकऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकारने कृषी क्षेत्रासाठी दोन नवीन योजना लाँच केल्या आहेत. नरेंद्र मोदींनी ३५,४४० कोटी रुपयांच्या योजना राबवल्या आहेत. या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. यामधील एक योजना म्हणजे दाल मिशन योजन आणि पीएम धन धान्य योजना.

PM Modi Launch 2 Government Schemes
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची आणखी एक योजना, उद्या होणार लाँच, वाचा बळीराजाला काय होणार फायदा

पीएम मोदींनी आज कृषी, पशुपालन, मत्स्य पालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील ५,४५० कोटी रुपयांच्या योजनादेखील लाँच केल्या आहे. याचसोबत ८१५ कोटींच्या इतर योजनांचीही पायाभरणी केली.

दलहन आत्मनिर्भरता मिशन

दलहन आत्मनिर्भरता मिशनसाठी ११,४४० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. डाळींचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. सध्या डाळींचे उत्पन्न २५२.३८ टन आहे. हे उत्पन्न वाढवून ३५० टन करण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना

पंतप्रधान मोदींनी आज पंतप्रधान धन धान्य कृषी योजनादेखील सुरु केली आहे. यामध्ये १०० जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे. या जिल्ह्यांमधील शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन, सिंचन आणि साठवणूक सुधारण्यासाठी, या जिल्ह्यांमध्ये कर्जाची सहज उपलब्धता करुन देण्यासाठी ही योजना राबवली आहे. या दोन्ही योजनांना मंत्रिमंडळाची मान्यता आधीच मिळाली आहे.

PM Modi Launch 2 Government Schemes
Narendra Modi Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल, पाहा EXCLUSIVE VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ४२ हजार कोटींच्या योजनांचे उद्घाटन केले आहे. यामध्ये अनेक योजना, प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये बंगळुरु आणि जम्मू काश्मीरमधील कृत्रिम रेतन प्रशिक्षण केंद्रे, अमरेली आणि बनासमधील उत्कृष्टता केंद्रे, राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत आसाममधील आयव्हीएफ प्रयोगशाळा अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

PM Modi Launch 2 Government Schemes
PM Modi: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना ४२००० कोटींचं गिफ्ट! दोन दिवसांत करणार मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com