PM Modi: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना ४२००० कोटींचं गिफ्ट! दोन दिवसांत करणार मोठी घोषणा

PM Modi Will Launch 42000 Crore Schemes: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांची घोषणा करणार आहेत.
PM Modi Salary
PM Modi SalarySaam Tv
Published On

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली आहे. या योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. अशातच केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार ११ ऑक्टोबरला शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार आहे.

PM Modi Salary
Small Saving Schemes: सरकारचा मोठा निर्णय! बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे वैसे; वाचा सविस्तर

मोदी सरकार ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करणार आहे. ४२०० कोटींच्या योजना लाँच केल्या जाणार आहेत. दरम्यान,या कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा हप्ता येणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मिडिया रिपोर्टनुसार, ११ ऑक्टोबर रोजी सरकार शेतकऱ्यांसाठी याआधी सुरु केलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात.सरकारने याआधी १६ जुलै रोजी पंतप्रधान धन धन योजना सुरु केली होती. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेसाठी सरकारने २४ हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात या योजनेबाबत मोठी घोषणा होऊ शकते.

PM Modi Salary
PM Kisan Yojana: दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार! या दिवशी पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यता

११ ऑक्टोबरला पीएम किसानच्या हप्त्याची घोषणा होणार?

पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आधीच जारी केला आहे.हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे २००० रुपये दिले आहेत. दरम्यान, त्यानंतर आता इतर राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.

PM Modi Salary
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com