PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! या ३ कारणांमुळे पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता रखडला, तुम्हीही ती चूक केलीय का?

PM Kisan Yojana 23rd Installment: तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल आणि तुम्हाला २३ वा हप्ता आला नसेल तर थांबा. पुढील बातमीत याबाबत महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे.
PM Kisan Yojana 23rd Installment
PM Kisan Yojana google
Published On

PM Kisan Yojana 23rd Installment:  शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २० जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यामध्ये २००० रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली. पण काही शेतकऱ्यांना याचा हप्ता मिळाला नाही. याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तर ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २ - २ हजार रुपये जमा केले जातात. २० जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये आले. पण काही शेतकऱ्यांचा हप्ता रखडल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. पण योजनेच्या नियमानुसार तुम्ही काही प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला याचा लाभ घेता येत नाही.

PM Kisan Yojana 23rd Installment
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2027 आधीच वाढणार पगार? मोठी अपडेट समोर

पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेण्यासाठी काही प्रोसेस असतात. त्यामध्ये सर्वात महत्वाची प्रोसेस म्हणजे ईकेवायसी आहे. जर तुम्ही ईकेवायसी (pm kisan yojana ekyc) पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला कोणताच हप्ता दिला जाणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पीएम किसान योजनेच्या अंतर्गत भू सत्यापन (Land Verification/Land Seeding) केलं नाहीत तर तुमच्या खात्यात जमा होणारे २००० रुपये कायमचे थांबवले जातील. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला हप्ता दिला जाणार नाही.

रखडलेला हप्ता पुन्हा दिला जातो का?

पीएम किसान योजनेचा हप्ता जर काही कारणांसाठी रखडला असेल तर त्याचं कारण तुम्ही जाणून घ्या. मग रखडलेली प्रोसेस पूर्ण करा. मग राज्य सरकार तुमचे नाव योजनेतून क्लिअर करेल. पुढे तुमच्या खात्यात रखडलेला हप्ता जमा होईल. हा हप्ता पुढच्या हप्त्यासोबतच पाठवला जाऊ शकतो.

PM Kisan Yojana 23rd Installment
EPFO Update: PF खातेदारांनो, तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले का? दोन मिनिटात करा चेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com