

नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रत्येक कर्मचारी त्याच्या पगारातला काही टक्के भाग हा पीएफमध्ये जमा करतात. याचा भविष्यात रिटायरमेंटनंतर किंवा गरजेच्या वेळी खूप फायदा होतो. पूर्वी (EPFO ) पीएफ काढण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत होत्या. आता ही प्रोसेस खूप सोपी झाली आहे. त्यासाठी आता घरबसल्या अधिकृत वेबसाइटवरून सर्व माहिती तुम्ही काढू शकता. त्यातच आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे.
PF खाते नियमित तपासणे का महत्त्वाचे? (Why is it important to check PF account regularly?)
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी EPF ठेवींवर ८.२५ टक्के रक्कम व्याज जमा करण्याची परवानगी दिली आहे. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे EPF खाते तपासत राहीले पाहिजे. त्यामुळे आर्थिक नियोजन करणं सोपं होऊ शकतं. तसेच अचानक आर्थिक गरज पडली की खात्यात किती रक्कम जमा आहे याची माहिती मिळते.तुम्हाला पीएफ तपासता येत नसेल तर तुम्ही पुढील काही स्टेप्स फॉलो करून संपूर्ण माहिती मिळवू शकता.
ऑनलाइन PF बॅलन्स तपासण्याची सोपी स्टेप (how to check pf balance)
ऑनलाइन पद्धतीने पीएफ तपासण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. त्यासाठी सर्वप्रथम EPFO च्या पासबुक पोर्टलला भेट द्या. पुढे UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. मग कॅप्चा भरल्यानंतर PF खाते निवडा. त्यानंतर तुमच्या खात्यातली शिल्लक रक्कम आणि व्यवहारांची माहिती दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.