PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्त्याची तारीख ठरली; वाचा केव्हा मिळणार 2000 रुपये

PM Kisan Sanman Nidhi Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे. पुढच्या महिन्यात हा हप्ता येण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवल्या आहेत. भारत सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना आहे. योजनेत नागरिकांना दर वर्षाला ६००० रुपये मिळतात. हे पैसे वर्षातून ३ हप्त्यांमध्ये मिळतात. या योजनेचा पुढचा हप्ता लवकरच नागरिकांना मिळणार आहे.

भारत देश हा कृषीप्रधान आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी योजना राबवण्यात आली आहे. २०१८ मध्ये भारत सरकारने ही योजना सुरु केली आहे.

PM Kisan Yojana
NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा १८वा हप्ता लवकरच नागरिकांना मिळणार आहे.या योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी मिळतात. जून महिन्यात योजनेत १७वा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर आता पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात योजनेचा पुढचा हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर महिन्यात कधीही पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो. या योजनेत १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

PM Kisan Yojana
PM Matru Vandana Scheme: गरोदर महिलांसाठी सरकारची खास योजना! मिळणार ६ हजार रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

पीएम किसान सन्मान योजनेत ई-केवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर शेतकऱ्यांनी ई-केवायस केले नाही तर त्यांना पैसे मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

e Kyc कसं करायचं?

सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या pmkisangov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या सेक्शनवर जा. त्यानंतर केवायसी पर्याय निवडा.

यानंतर केवायसी पेजवर १२ अंकी आधार नंबर टाकावा. त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. त्यानंतर सबमिट करा.

यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होईल. पुढील प्रोसेस झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल.

योजनेचा स्टेट्‍स कसा चेक करावा?

सर्वप्रथम तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. तिथे Know Your Statusवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला योजनेचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला योजनेची स्थिती समजेल.

PM Kisan Yojana
Post Office Scheme: नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, फक्त व्याजातूनच मिळणार २ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com