प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोट्यवधि शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार, याची वाट पाहत होते. आता लवकरच हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून १८वा हप्ता जारी केला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुमचे ई केवायसी झाले नसेल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ई केवायसी अपडेट करण्यास सांगितले आहे.
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
त्यानंतर होमपेजवरील Farmers Corner या सेक्शनमध्ये जा. त्यानंतर eKYC पर्याय निवडा.
यानंतर eKYC पेजवर १२ अंकी आधार नंबर टाकावा लागेल.
त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाका.
ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा.यानंतर तुमचे ई केवायसी पूर्ण होईल. यानंतर तुमच्या मोबाईलवर ई केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.
योजनेचा स्टेट्स कसा चेक करावा?
सर्वप्रथम तुम्ही pmkisan.gov.in वेबसाइटवर जा. त्यानंतर Know Your Status वर क्लिक करा.
यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा नोंदणी क्रमांक टाकावा. यानंतर तुमच्या योजनेचे स्थिती तुम्हाला दिसेल.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. हे पैसे ३ हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येकी दोन हजार रुपये प्रत्येक हप्त्यांमध्ये दिले जातात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने या योजनेत १७ हप्ते जारी केले आहेत. त्यानंतर आता लवकरच १८ वा हप्ता जारी करणार आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.