PM Kisan Mandhan Yojana: आता शेतकऱ्यांनाही दरमहा ₹३००० पेन्शन मिळणार, काय आहे सरकारची योजना अन् अर्ज कसा करायचा?

PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
PM Kisan Yojan:
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसान मानधन योजना

शेतकऱ्यांना दर महिन्याला मिळणार पेन्शन

रजिस्ट्रेशन कसं करावं?

केंद्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असतात. केंद्र सरकारने शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्व नागरिकांसाठी वेगवेगळया योजना राबवल्या आहे. शेतकऱ्यांना त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाते. यासाठी पीएम किसान राबवण्यात आहे त्यात शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये मिळतात. यानंतर शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते.

PM Kisan Yojan:
PM Kisan Mandhan Yojana: खुशखबर! शेतकऱ्यांना दर महिन्याला मिळणार ₹३०००; पीएम किसान मानधन योजना आहे तरी काय?

केंद्र सरकारने पीएम किसान मानधन योजनेची सुरुवात केली होती.लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होणार आहे.

पीएम किसान मानधन योजनेत वयाचे ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेत ३००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे. वर्षभरात तुम्हाला ३६००० रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्ही जेवढे पैसे जमा करणार ते थेट तुमच्या पेन्शन खात्यात जमा केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेतील ही लहान गुंतवणूक तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

जर काही कारणांनी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची ५० टक्के पेन्शन त्यांच्या पत्नीला मिळते.या योजनेत ६० वर्षानंतर दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.थेट तुमच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर केले जातात.

PM Kisan Yojan:
PM Kisan Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतात ₹१२०००; पीएम किसानशिवाय या योजनेचा मिळतो लाभ

अर्ज कसा करावा? (PM Kisan Mandhan Yojana Application Process)

या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला कृषी विभागाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. याचसोबत जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्हाला अर्ज करताना तुमची सर्व कागदपत्रे स्वतः जवळ ठेवायची आहे. यानंतर फॉर्म भरायचा आहे.

PM Kisan Yojan:
Post Office Scheme: ५ लाखांचे होणार १० लाख; पोस्टाच्या या योजनेत फक्त ११५ महिन्यात पैसे होणार डबल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com