Phone Pe Update : आता इंटरनेट नसतानाही पाठवा पैसे; PhonePe ची भन्नाट सुविधा

Digital Payments : PhonePe ची UPI १२३ पे सेवा निवडक फीचर फोनवर इंटरनेटशिवाय पैसे पाठवण्याची सुविधा देते. युजर्स पेमेंट, बॅलेन्स तपासणी आणि व्यवहारांची माहितीही सहज मिळवू शकतात.
Phone Pe
Phone Pemeta ai
Published On

सध्या कॅश व्यवहारांपेक्षा ऑनलाइन व्यवहाराचा ऑप्शन सगळे निवडायला लागलेत. यामध्ये एका क्लिकवर शून्य मिनिटांत पेमेंट होतं. पण त्यासाठी इंटरनेट महत्त्वाचं आहे. मात्र आता ही समस्याही दूर होणार आहे. PhonePe ने निवडक फीचर फोनसाठी UPI 123Pay सेवा सुरू केली आहे. या सुविधेची खासियत म्हणजे इंटरनेट कनेक्शनशिवायही पैसे पाठवणे आणि पेमेटं करणे शक्यत होणार आहे.

PhonePe च्या माहितीनुसार, ही सेवा एसएमएस आधारित पद्धतीने काम करते. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असलेल्या भागातल्या ग्राहकांना त्याचा फायदा होऊ शकतो. कंपनीच्या मते, भारतात २० कोटींपेक्षा जास्त फीचर फोन यूझर्स आहेत आणि त्यांनाही UPI व्यवस्थेशी जोडण्याच्या उद्देशाने ही सुविधा आणण्यात आली आहे.

Phone Pe
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ₹14.10 लाख? 8व्या वेतन आयोगाचं संपूर्ण गणित समजून घ्या

फीचर फोनवर कोणती कामं करता येणार?

UPI 123Pay च्या मदतीने फिचर फोनवरून एका व्यक्तीला पैसे पाठवणे, दुकानदाराला पेमेंट करणे, बँक बॅलेन्स तपासणे आणि जुन्या व्यवहारांची माहिती पाहणे शक्य होईल. भविष्यात बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज आणि आधारच्या माध्यमातून UPI रजिस्ट्रेशन यांसारख्या सुविधा जोडण्याची कंपनीची योजना आहे.

Phone Pe
Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

कोणत्या फोनवर मिळणार सुविधा?

सुरुवातीला HMD १०५ 2G, HMD ११० 2G, Nokia १०५ Classic, Nokia १०५ Single SIM, Nokia १०५ Dual SIM, Nokia १०६ आणि Nokia १२३ Shield यांसारख्या निवडक मॉडेल्समध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. HMD, Nokia, Lava International आणि Itel Mobile यांच्या काही फीचर फोनमध्येही सपोर्ट दिला जात आहे.

UPI 123Pay कसं सुरू करायचं?

सपोर्ट करणाऱ्या फीचर फोनमध्ये फोनपे अॅप उघडून नियम आणि अटी स्वीकाराव्या लागतील. त्यानंतर बँक निवडून डेबिट कार्डचे शेवटचे ६ अंक आणि एक्सपायरी डेट द्यावी लागेल. पुढे UPI PIN तयार केल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. यानंतर मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट किंवा UPI ID वापरून पैसे पाठवता येतील. कॅमेरा असलेल्या फीचर फोनमध्ये QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करता येऊ शकतो.

१२ भारतीय भाषांमध्ये व्हॉइस हेल्पलाइन

PhonePe ने UPI 123Pay साठी AI आधारित व्हॉइस हेल्पलाइनची सुविधाही उपलब्ध केली आहे. इंग्रजीसह १३ भारतीय भाषांमध्ये यूजर्सना स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन मिळणार आहे. इंटरनेट नसतानाही व्यवहार करण्याची सुविधा असल्यामुळे कमकुवत नेटवर्क किंवा मर्यादित 2G कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांसाठी UPI 123Pay फायदेशीर ठरू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com