EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Amnesty Scheme 2026 : PF Trust चालवणाऱ्या कंपन्या आणि संस्थांसाठी केंद्र सरकारची Amnesty Scheme 2026 महत्त्वाची आहे. पात्र ट्रस्टना exemption status नियमित करण्याची संधी आहे.
EPFO New Rule
EPFO New Rulemeta ai
Published On: 

कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Provident Fund (PF) Trust चालवणाऱ्या कंपन्या आणि संस्थांसाठी केंद्र सरकारने Amnesty Scheme, 2026 सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश Income Tax Act, 1961 अंतर्गत मानता असलेल्या, मात्र EPFO कडून औपचारिक सूट (Exemption) आदेश न मिळालेल्या PF Trustsना त्यांची स्थिती नियमित करण्याची संधी देणे हा आहे. ही एकदाच उपलब्ध होणारी विशेष सुविधा आहे.

Income Tax Act, 2025 मध्ये बदल होणार?

Finance Act, 2026 नंतर Recognized Provident Fund मधले इनकम टॅक्स नियम आणि EPF कायद्यातल्या तरतुदींमध्ये सुसूत्रता आणण्यात आली आहे. आता Income Tax Act, 2025 अंतर्गत PF ची मान्यता मिळण्यासाठी संबंधित PF ला EPF & MP Act, 1952 च्या Section 17 अंतर्गत exemption मिळालेले असणं आवश्यक आहे.

यामुळे ज्या PF Trustsना पूर्वी Income Tax Act अंतर्गत मान्यता होती, परंतु EPFO कडून औपचारिक exemption order मिळालेला नव्हता, त्यांच्यासाठी Amnesty Scheme महत्त्वाची ठरते.

EPFO New Rule
Farmer Loan Waiver Scheme : दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा

कोणत्या PF Trustsना योजनेचा लाभ?

ही योजना मुख्यतः अशा संस्थांसाठी आहे, ज्या Income Tax Act, 1961 अंतर्गत Recognized PF Trust चालवत होत्या; मात्र Section 17 अंतर्गत औपचारिक exemption notification त्यांच्याकडे नव्हते. अशा संस्थांना त्यांचा PF Trust मागील कालावधीपासून नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे.

EPFO New Rule
Gold Price Today: सप्टेंबरच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा कितीला? २४, २२ अन् १८ कॅरेटचे दर

काय मिळणार फायदा?

Amnesty Scheme अंतर्गत पात्र संस्थांना PF Trust च्या exemption status चे retrospective regularisation मिळू शकते. काही पात्रता अटींमध्येही सवलत देण्यात आली आहे. यामध्ये कर्मचारी संख्या, corpus आणि पूर्वीच्या compliance संदर्भातील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच ठरावीक अटी पूर्ण झाल्यास प्रलंबित dues, damages आणि interest संबंधित काही कायदेशीर कार्यवाही abate होऊ शकते.

अर्जासाठी महत्त्वाची तारीख

Amnesty Scheme 2026 ही 29 जून 2026 रोजी अधिसूचित करण्यात आली असून ती सहा महिन्यांसाठी लागू आहे. सध्याच्या EPFO माहितीनुसार अर्जाची अंतिम मुदत 28 डिसेंबर 2026 आहे.पात्र पीएफ ट्रस्टनी संबंधित EPFO Regional Office मार्फत अर्ज करणे आवश्यक आहे. आर्थिक खात्यांचे Chartered Accountant कडून audit करून घेण्याचीही अट आहे. त्यामुळे संबंधित संस्था आणि पीएफ ट्रस्ट व्यवस्थापनाने कागदपत्रे आणि compliance वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com