Petrol Diesel Rate Today: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; एका लिटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या

Petrol Diesel Rate 3rd July 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel Rate TodaySaam TV

देशभरात पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात चढ-उतार दिसत होते. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलवर लागणारा वॅट दर कमी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव काही दिवसांपूर्वी घसरले होते.

आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ८६.७३ डॉलवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल ८३.४५ डॉलरवर विकले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Petrol Diesel Rate
Motorola S50 Neo: चार वर्षाच्या गॅरंटीवाला Moto S50 Neo लॉन्च; कॅमेरा पाहून म्हणाल Wow; जाणून घ्या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोल १०४.९५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.तर डिझेल ९१.७६ रुपयांवर विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.९८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.५६ रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Rate
Gold Silver Rate : सोन्यासह चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील नवे दर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुण्यात एक लिटर पेट्रोल १०४.०२ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५५ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.५८ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल ९०.१० रुपयांवर विकले जात आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.६९ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५१ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०४.०७ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९०.६३ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.५० रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०४ रुपये प्रति लिटर आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.१२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.६२ रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Rate
Unacademy Layoff: Unacademy ने ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, कारण ऐकून तुमचीही चिंता वाढेल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com