

पेट्रोल डिझेलचे दर बदलले
महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर
आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले
जागतिक पातळीवर सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर होत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर वाढल्यावर इंधनाच्या दरातदेखील वाढ होते. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम हा भारतावरदेखील होत आहे. भारतात पेट्रोल डिझेलचे दर बदलताना दिसत आहे.
भारतात काही खाजगी पेट्रोल वितरक कंपन्यानी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातदेखील काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित बदल झाला आहे. काही ठिकाणी दर वाढले आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.
महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate in Maharashtra)
मुंबईत पेट्रोलचे दर १०३.५४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर (Mumbai Petrol Rate)
पुण्यात पेट्रोलचे दर १०४.२९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.८१ रुपये प्रति लिटर Petrol Diesel Rate in Pune)
ठाण्यात पेट्रोलचे दर १०४.३७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.८६ रुपये प्रति लिटर (Thane Petrol Rate)
नाशिकमध्ये पेट्रोल दर १०४.४६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.९८ रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.०५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.६१ रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.७३ रुपये तर डिझेलचे दर ९१.२७ रुपये प्रति लिटर
साताऱ्यात पेट्रोलचे दर १०४.७६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.२९ रुपये प्रति लिटर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.