Petrol Diesel Rate : पेट्रोल आणि डिझेल तब्बल इतक्या रुपयांनी महागणार; तज्ज्ञांनी सांगितलं दरवाढीचं कारण

Petrol Diesel Today Rate : मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
PETROL DIESEL PRICE HIKE ALERT: FUEL RATES MAY INCREASE BY ₹5 PER LITRE AMID CRUDE OIL SURGE
PETROL DIESEL PRICE HIKE ALERT: FUEL RATES MAY INCREASE BY ₹5 PER LITRE AMID CRUDE OIL SURGESaam Tv
Published On
Summary
  • पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता

  • मध्यपूर्वेतील ताणतणावामुळे दर वाढण्याची शक्यता

  • सरकारी तेलांच्या कंपनीचा मोठा तोटा

  • तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ होण्याची शक्यता

वाहनधारकांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये तब्बल ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला तरी जागतिक घडामोडींमुळे वाहनधारकांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान, ५ जून २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मौद्रिक धोरण जाहीर करताना रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीवरील दबाव यामुळे महागाई वाढण्याचा धोका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर RBI ने किरकोळ महागाईचा अंदाज ४.६ टक्क्यांवरून ५.१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

PETROL DIESEL PRICE HIKE ALERT: FUEL RATES MAY INCREASE BY ₹5 PER LITRE AMID CRUDE OIL SURGE
Monsoon Rain Alert : महाराष्ट्रात काही तासांत मान्सूनची एंट्री, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

मागील मे महिन्यात फक्त दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली होती. २५ मे २०२६ रोजी झालेल्या शेवटच्या दरवाढीनंतर मात्र ६ जूनपर्यंत इंधन दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र ICRA आणि CRISIL च्या विश्लेषणातून असा इशारा देण्यात आला आहे की, पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर आणखी ५ रुपयांनी वाढ होऊ शकते. जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारातील अस्थिरतेमुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी दर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

PETROL DIESEL PRICE HIKE ALERT: FUEL RATES MAY INCREASE BY ₹5 PER LITRE AMID CRUDE OIL SURGE
Mumbai : मुंबई हादरली! बेपत्ता कुख्यात गुंडाची हत्या, गटारात आढळला मृतदेह

राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर पाहता मुंबईमध्ये पेट्रोल १११.१८ रुपये, तर डिझेल ९७.८३ रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यात पेट्रोल ११२.०४ रुपये आणि डिझेल ९८.६८ रुपये, नागपुरात पेट्रोल १११.८० रुपये आणि डिझेल ९८.४८ रुपये दराने विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोल ११२.४४ रुपये आणि डिझेल ९९.०७ रुपये, तर कोल्हापुरात पेट्रोल ११२.५७ रुपये आणि डिझेल ९९.२३ रुपये आहे. अमरावतीमध्ये पेट्रोल ११२.८९ रुपये आणि डिझेल ९९.५४ रुपये असून ठाण्यात पेट्रोल १११.३८ रुपये आणि डिझेल ९८.०० रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com