

कच्च्या तेलाच्या दरात घसरण
आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल
चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर ९८.१० रुपये
देशातील प्रमुख शहरांमधील आजचे पेट्रोलचे दर आले समोर
पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होण्याची ते वाट पाहत आहेत. अशातच एक आनंदाची बातमी आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या अपेक्षेने आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. आज कच्च्या तेलाचे दर पुन्हा घसरले. कच्च्या तेलाचा दर ०.०१० टक्क्यांच्या घसरणीसह सुमारे ८३ डॉलरवर आला आहे. ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ८८ डॉलर इतका झाला आहे.
कच्च्या तेलाच्या दरात सलग सहाव्या दिवशी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात जरी थोडीफार घसरण झाली असली तरी गेल्या एका वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात जरी घसरण झाली असली तरी देखील आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तुमच्या शहरातील आजचे दर किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...
नवी दिल्ली - १०२.१२ रुपये
मुंबई - 111.18 रुपये
कोलकाता – रु ११३.४७ रुपये
चेन्नई - 107.77 रुपये
गुरुग्राम - रु १०२.७७ रुपये
नोएडा - रु १०२.१२ रुपये
बंगळूर - रु ११०.९३ रुपये
भुवनेश्वर – रु १०९.९२ रुपये
चंदीगड - ९८.१० रुपये
हैदराबाद - रु ११५.६९ रुपये
जयपूर - रु. ११२.६६ रुपये
लखनौ - १०२.०५ रुपये
पाटणा - रु ११३.३५ रुपये
तिरुअनंतपुरम् - 115.49 रुपये
दरम्यान,ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी शेवटची पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ मे महिन्यात केली होती. २५ मे पासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. १५ मे ते २५ मे दरम्यान तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ केली. २०२२ नंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची ही पहिलीच वेळ होती.
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेली होती. याचा परिणाम जगभरातील अनेक देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे भारतात तेल कंपन्यांना दररोज १,००० कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान होत होते. केंद्र सरकारने तेल कंपन्यांचे नुकसान कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर देखील कमी केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.