Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. त्यानंतर आज भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल झाला आहे. वाचा तुमच्या शहरातील प्रति लिटर दर किती?
Petrol-Diesel Price: भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल, तुमच्या शहरातील आजचे दर किती?
petrol diesel price Saam Tv
Published On
  • भारतातील आजचे पेट्रोल -डिझेलचे दर बदलले

  • शहरानुसार पेट्रोल डिझेलचे दरात बदल

  • कच्च्या तेलाच्या दराचा पेट्रोलवर परिणाम

अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील वाद पुन्हा वाढला आहे. या देशात पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले सुरू झालेत. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला. या इशाऱ्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, पुढील ६ ते १२ महिन्यांत ऊर्जा किमती पुन्हा कमी होतील. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारतीय सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. २५ मे २०२६ नंतर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

भारतीय पेट्रोलियम कंपन्या एचपीसीएल, आयओसीएल आणि भारत पेट्रोलियम यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी केले. दिलासादायक बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७६ डॉलरच्या पुढे गेल्या असूनही आज भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतच्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महत्वाचे म्हणजे कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलच्या किमतीत १० डॉलरची वाढ झाल्यास भारतातील तेल विपणन कंपन्यांना प्रति लिटर अंदाजे ६ रुपयांचा तोटा होतो. असे असताना देखील भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी यावर्षी मे महिन्यात चार वेळा दरवाढ केली होती. फक्त ११ दिवसांत ही दरवाढ करण्यात आली होती. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वात आधी १५ मे २०२६ रोजी पेट्रोल ३ रुपयांनी आणि डिझेल ३.२९ पैशांनी वाढ केली होती. १९ मे रोजी पेट्रोल ८७ पैशांनी आणि डिझेल ९१ पैशांनी, २३ मे २०२६ रोजी पेट्रोल ८७ पैशांनी आणि डिझेल ९१ पैशांनी, तर २५ मे २०२६ रोजी पेट्रोल २.६१ रुपयांनी आणि डिझेल २.७१ रुपयांनी वाढले होते. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर किती?

तेल कंपन्यांकडून आज मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत १११.२१ , कोलकाता ११३.५१, चेन्नई १०७.७७, पाटणामध्ये ११३.३७ रुपयांना विकले जात आहे.

तुमच्या शहरातील डिझेलचे दर किती?

तर आज डिझेलच्या दरात देखील कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत ९७.८३ , कोलकाता ९९.८२, चेन्नई ९९.५५, पाटणामध्ये ९९.३६ रुपयांना विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com