

ओरॅकल कंपनीतून ३०,००० कर्मचाऱ्यांना काढले
१२,००० भारतीयांचाही समावेश
खर्चात कपात करण्यासाठी कंपनीचा मोठा निर्णय
अमेरिकन टेक कंपनी ओरॅकलने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओरॅकलने हजारो कर्मचाऱ्यांना अचानक कामावरुन काढून टाकले आहे. यामध्ये अनेक भारतीयांचादेखील समावेश आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ओरॅकल कंपनीने जागतिक पातळीवर जवळपास ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये १२,००० भारतीयांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भारतीयांचीदेखील चिंता वाढली आहे.
सकाळी ६ वाजता मेल आला अन् ३०,००० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
ओरॅकल कंपनीच्या ३०,००० कर्मचाऱ्यांना सकाळी ६ वाजता मेल आला होता. ओरॅकल लीडरशीपकडून मेल आला होता. यामध्ये लिहले होते की, तुम्हाला कंपनीतून काढले जात आहे. एका मोठ्या संघटनात्मक बदलाचा हा भाग आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या शेवटच्या कामाचा दिवसाचाही उल्लेख होता. यानंतर अनेक लोकांच्या सिस्टीम ब्लॉक करण्यात आल्या आहेत. पहाटे आलेल्या या ईमेलमुळे हजारो कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या खर्चात कपात करण्यासाठी आणि बिझनेस स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कंपनी एआयचा वापर आणि ऑटोमेशनवर आधारित काम करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पारंपारिक कामांवर परिणाम होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या एका झटक्यात नोकऱ्या गेल्या आहेत.
ओरॅकल कंपनी काय काम करते?
ओरॅकल ही एक अमेरिकन टेक कंपनी आहे. ही कंपनी जगभरात सॉफ्टवेअर आणि क्लाउड सर्व्हिस देण्याचे काम करते. ही कंपनी डेटाबेस मॅनेजमेंटच्या कामासाठी ओळखली जाते. दरम्यान, एवढ्या मोठ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची कपात केल्याने इतर कर्मचाऱ्यांना टेन्शन आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.