ओल्ड मॉन्क आता रम नाही
FSSAI ने ओल्ड मॉन्कला रम फ्लेवर्ड स्पिरिट म्हटले
ओल्ड मॉन्क रम विक्री बंद झाली
ओल्ड मॉन्क प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले
मद्याच्या दुनियेत ओल्ड मॉन्क अगदी लोकप्रिय ब्रँण्ड आहे. माफक किंमत आणि चव यामुळे सर्व स्तरात ओल्ड मॉन्क रमचे चाहते आहेत. सध्या मात्र कारवाईमुळे ही रम विक्रीसाठी बंद आहे. FSSAI ने हायकोर्टात काय दावा केलाय? ओल्ड मॉन्क यापुढे रम राहणार की नाही? पाहूया एक रिपोर्ट...
मद्याच्या दुनियेत ओल्ड मॉन्क हे नाव सर्वदूर परिचित आहे. त्यातही ओल्ड मॉन्क हे नाव ऐकल्यावर लोकांच्या मनात सर्वप्रथम रम हा शब्द येतो. महाराष्ट्रामध्ये ओल्ड मॉन्कच्या विक्रीवर कारवाई झाल्यानंतर मात्र मोठा वाद निर्माण झाला आहे. तपासणीदरम्यान न्यूट्रल स्पिरिटमध्ये फ्लेवरिंग्ज म्हणजेच सुगंधी पदार्थ आढळून आले. त्यामुळे 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण' म्हणजेच FSSAI ने उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घातली. त्यानंतर कंपनीने पॅकेजिंगमध्ये बदल करण्यास आणि बाटलीवर अतिरिक्त फ्लेवरिंग्ज ठळकपणे प्रदर्शित करण्यास सहमती दर्शवली आहे. हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोचला आहे. FSSAI ने न्यायालयात नेमके काय सांगितले? ते पाहूया..
FSSAI च्या मते, रम म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या स्वरूपासंबंधीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियामकाच्या मते, ओल्ड मॉन्कच्या उत्पादनांमध्ये न्यूट्रल स्पिरिट्स आणि रम फ्लेवरिंगचा वापर केला जातो. त्यामुळे, ते रमऐवजी रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स म्हणून विकले जाऊ शकते
न्यायालयाने '7 इयर्स ओल्ड ब्लेंडेड' आणि 'व्हेरी ओल्ड व्हॅटेड' यांसारख्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयाने कंपनीला पॅकेजिंगवर आवश्यक माहिती स्पष्टपणे नमूद करण्याचे निर्देशही दिले आहेत. कंपनीने आता FSSAI कडे नवीन लेबल्स सादर केली आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, अनेक उत्पादक असे बाह्य फ्लेवरिंग्ज टाकत होते. ज्यामुळे उत्पादनांना सामान्य रम किंवा व्हिस्कीसारखी चव आणि सुगंध येत होता. ओल्ड मॉन्कमध्येही वापरण्यात येणाऱ्या न्यूट्रल स्पिरिटमध्ये रमचा स्वाद मिसळलेला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होईल. त्यामुळे ओल्ड मॉन्कची विक्री पूर्णपणे बंद होईल की ब्रँडला 'रम' हे नाव कायमचे सोडावे लागेल, याकडे मद्यप्रेमींचं लक्ष आहे. मात्र ब्रँण्ड कुठलाही असो ग्राहकांची फसवणूक होणार नाही, हे पाहणं महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.