
सरकारने ओला, उबरच्या कंपन्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता या अॅपद्वारे चालणाऱ्या टॅक्सीचे रजिस्ट्रेशन फक्त ८ वर्षांपर्यंत चालणार आहे. यानंतर या टॅक्सी वापरता येणार नाही. त्यामुळे फक्त ८ वर्षांसाठी तुम्हाला ओला-उबरच्या टॅक्सी वापरता येणार आहे.
८ वर्षांच्या वापरानंतर जरी वाहन चांगल्या अवस्थेत असेल किंवा वाहन चालवता असेल तरीही या वाहनांना चालवण्याची परवानगी नसणार आहे.८ वर्षानंतर हे वाहन कमर्शियल उपयोगासाठी वापरले जाणार नाही. हे वाहन रिटायर्ड मानले जाणार आहे. हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयाचा परिणाम हजारो वाहनचालकांवर होणार आहे. ज्या वाहनचालकांचा महिन्याचा खर्च हा ओला-उबर चालवून होतो त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
प्रवाशांसाठी फायदा
सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी
जुन्या टॅक्सीमध्ये एअरबॅग्ज, ABS किंवा बेसिक सेफ्टी फीचर्स नसतात. यामुळे प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो. या निर्णयामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.
प्रदुषण होणार नाही
जुनी वाहने ही जास्त प्रमाणात प्रदुषण करतात. आठ वर्षांपर्यंतची वाहने कमी प्रदुषण करतात. यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे.
वाहनचालकांना फटका
ज्यांनी आपली वाहने लोनवर घेतली आहे त्याचे ईएमआय पूर्ण झाले आहे. यानंतर आता ८ वर्षानंतर वाहने वापरता येणार नाही. यामुळे वाहनचालकांना फटका बसणार आहे. याचसोबत डिझेल, अॅप किंवा कमिशनचा फटका बसणार आहे.
जुन्या वाहनांचे काय होणार?
ओला(OLA) आणि उबरच्या (UBER) डेटानुसार, २० टक्के टॅक्सी या ८ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. त्यामुळे यांना रिप्लेस करावे लागेल किंवा स्वतः च्या वापरासाठी ठेवाव्या लागतील. या वाहनांना तुम्ही विकूदेखील शकता. परंतु यामुळे वाहनचालकांच्या खिशाला फटका बसणार असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य लोकांना हे परवडण्याजोगे नाही आबे. ईएमआय संपत नाही तेच तुम्हाला वाहनदेखील वापरता येणार नाही, असं वाहनचालकांसोबत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.