.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
NTPC लिमिटेडमध्ये नोकरीची संधी
वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु
स्टायपेंड मिळणार २१५०० रुपये
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एनटीपीसी लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. आयटीआय केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी कंपनीत काम करण्याची संधी आहे. एनटीपीसी लिमिटेडमध्ये Artisan Trainee आणि Assistant Trainee पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.
NTPC मध्ये नोकरीची संधी
एनटीपीसी लिमिटेडमधील (NTPC Recruitment)नोकरीसाठी एकूण २७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, स्टोअर कीपर पदांसाठी भरती केली जाणार आहे. टेक्निकल फील्डमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे. याचसोबत टायपिंगदेखील यायला हवे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर Recruitment किंवा Careers सेक्शनवर जायचे आहे. यानंतर सर्व माहिती भरायची आहे. यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.
एनटीपीसी लिमिटेडमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असावी. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगच्या काळात २१,५०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. स्टायपेंड पूर्ण झाल्यानंतर तुमची बेसिक सॅलरी २१५०० रुपये होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.