

सरकारी कंपनीत नोकरीची संधी
सिडबीत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती
अर्ज कसा करावा?
चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिडबीमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ऑफ इंडिया ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
सिडबी कंपनीच्या या नोकरीबाबत सविस्तर जाहिरात लवकरच वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येईल. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.
ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची आहे.त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या भरती मोहिमेत डेटा सायंटिस्ट, एआय स्पेशलिस्ट, डेटा इंजिनियर्स, रिलेशनशिप मॅनेजर अशा अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ७ एप्रिलपर्यंत अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सिडबीमधील या भरती मोहिमेत डेटा सायंटिस्ट, एआय स्पेशलिस्ट, एमएल इंजिनियर्स, डेटा इंजिनियर्स, डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, रिलेशनशिप मॅनेजर कॉर्पोरेट डिपॉझिट, पोर्टफोलियो मॅनेजर, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॅनेजर, क्लस्टर मॅनेजर अशा पदांसाठी भरती होणार आहे. एकूण १४ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
सिडबीमधील नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने संबंधित क्षेत्रात डिग्री प्राप्त केलेली असावी. इंजिनियरिंग/डाटा साइंस/फाइनान्स/आईटीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी सविस्तर अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.sidbi.in वर जायचे आहे.
यानंतर Career & Recruitment सेक्शनवर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला SIDBI invites Applications for Engagement of Specialist Officers on full-time Contractual Basis - 2025-26 वर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमचे नाव, गाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता अशी सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे.फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.