Namo Shetkari Yojana : तुमचेही ६ हजार रुपये अडकलेत का? ९१ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, आत्ताच चेक करा

Namo Shetkari Installment : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे तीन हप्ते रखडल्याने महाराष्ट्रातील ९१ लाखांहून अधिक शेतकरी सहा हजार रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी विभागाने तीन हप्त्यांसाठी निधीची मागणी केली असून वित्त विभागाची मंजुरी अद्याप प्रलंबित आहे.
Namo Shetkari Yojana
Namo Shetkari YojanaSaam Tv
Published On: 

Namo Shetkari Yojana Payment Update: राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे ३ हप्ते अद्याप रखडलेले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. त्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते कधी जमा केले जाणार? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ‘नमो शेतकरी सन्मान’च्या (Namo Shetkari Sanman Nidhi) ३ हप्त्यासाठी कृषी विभागाने ५४२५ कोटींचा निधी उपलब्ध व्हावा, असे पत्र पाठवण्यात आले. त्यावर वित्त विभागाकडून अजूनही उत्तर मिळाले नसल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतून प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात. केंद्राचा हप्ता वितरित झाल्यानंतर २ ते ३ आठवड्यात दिवसांत राज्याच्या योजनेतूनही पात्र शेतकऱ्यांना हप्ता वितरीत होतो. पण वर्ष झाले तरीही राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी सन्मान निधी’चा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये दिवाळीत येतील असा अंदाज वर्तवला जात होता.

Namo Shetkari Yojana
Accident : लग्नाहून येताना भीषण अपघात! SUV आणि पिकअपची जोरात धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर

कृषी विभागाकडून याआधीच २ हप्त्यासाठी ३७०० कोटी रुपये मिळावेत म्हणून सरकारकडे मागणी केली होती. आता पीएम किसान योजनेच्या हप्त्यानंतर कृषी विभागाकडून ३ हप्त्यासाठी एकत्र पैसे मागितले आहेत. राज्यातील ९१ लाख १२ हजार ७३५ शेतकऱ्यांसाठी एक हजार ८२२ कोटी ५४ लाख ७० हजार रुपयांचा निधी शासनाकडे मागितलाय. पण इतर योजना, कर्मचाऱ्यांचे, आमदार-माजी आमदारांचे वेतन, पेन्शन, कर्जावरील व्याज यातून पैसेच शिल्लक राहात नसल्याने सध्या निधी मिळत नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

Namo Shetkari Yojana
पंढरपूरमध्ये भयंकर दुर्घटना; विहिरीचा कठडा कोसळून ४ जण ढिगाऱ्याखाली, तिघांचे मृतदेह बाहेर काढले

राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी निधी मिळावा म्हणून वित्त विभागाला प्रस्ताव पाठवला आहे. दुसरीकडे केंद्राने नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईची रक्कम वाढविल्याने राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाला दुष्काळ मदतीचा फेरप्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सकाळला सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.