Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Girl Child Education Scheme: मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना मुलींच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक मदत देते. सहा टप्प्यांत २५,००० रुपये मिळतात. पात्र कुटुंबांनी अधिकृत वेबसाइटवर अर्ज करून थेट लाभ घ्यावा.
UP government scheme
Kanya Sumangala Yojanagoogle
Published On

मुलींसाठी भारतात अनेक योजना राबवल्या जातात. त्यांच्या उच्च शिक्षणाच्या हेतूने आणि त्या स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने भारत सरकार नेहमीच मुलींसाठी योजना राबवतं. जसं की, महाराष्ट्रात लेक लाडकी योजना आहे. तसंच उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना राबवली जाते. यामध्ये मुलींना त्यांच्या जन्मापासून ते उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत मिळते.

कन्या सुमंगला योजनेचा लाभ आत्तापर्यंत २७ लाखांपेक्षा जास्त मुलींना घेतला आहे. २०१९ पासून या योजनेची सुरुवात झाली होती. याचा हप्ता हा लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट पाठवला जात आहे. याचा लाभ तुम्हाला सहा टप्प्यांमध्ये दिला जातो. त्यामध्ये मुलीच्या जन्मापासून ते तिच्या उच्च शिक्षणापर्यंतचा कालावधी असतो. हा निधी राज्य सरकारकडून पुरवला जातो.

UP government scheme
Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर (mksy.up.gov.in) या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागतो. तसेच याचा हप्ता तुम्हाला पीएफएमएसच्या मदतीने थेट तुमच्या बॅंक खात्यांमध्ये पाठवला जातो. यामध्ये कोणतीच लाभार्थी वगळली जात नाही. प्रत्येकालाच हा लाभ घेता येतो. पण याच्यासाठी काही अटी असतात. जर तुम्ही त्यास पात्र असाल तरच तुम्हाला हा लाभ मिळतो.

कन्या सुमंगला योजनेच्या अटी

१. लाभार्थीचे कुटुंब हे उत्तर प्रदेशमधले स्थायिक असायला हवेत.

२. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवे.

३. एका कुटुंबातील फक्त २ दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

४. जर एखाद्या महिलेला तिच्या दुसऱ्या प्रसूतीत दोन जुळ्या मुली असतील. तर तिसऱ्या मुलीलाही याचा लाभ मिळेल.

सहा टप्प्यांमध्ये कसे पैसे मिळतात?

कन्या सुमंगला योजनेच्या अंतर्गत मुलींना पहिल्या टप्प्यात म्हणजे मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये मिळतात. दुसऱ्या टप्प्यात १ वर्षाचे लसीकरण झाल्यानंतर २ हजार, तिसऱ्या टप्प्यात, पहिलीत प्रवेश केल्यावर ३००० रुपये, चौथ्या टप्प्यात म्हणजे सहावीत गेल्यावर ३००० रुपये, पाचव्या टप्प्यात नववीत गेल्यानंतर ५०००, सहाव्या टप्प्यात म्हणजेच दहावीत गेल्यावर किंवा १२ वीत गेल्यावर ७००० रुपये अशी रक्कम दिली जाते. म्हणजेच मुलींना एकूण २५,००० रुपये मुलींना यामध्ये मिळतात.

UP government scheme
Tanvi Kolte: Bigg Boss 6 ची विजेती तन्वी कोलतेचं वय आणि शिक्षण किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com