Most Expensive Mithai: जगातील सर्वात महागडी मिठाई! किंमत १,११,००० रुपये; कुठे मिळते?

Most Expensive Gold Sweet Swarn Prasadam Mithai: जगातील सर्वात महागडी मिठाई ही भारतात तयार केली जाते. या मिठाईची किंमत प्रति किलो एक लाख ११ हजार रुपये आहे.
Most Expensive Mithai:
Most Expensive Mithai:saam Tv
Published On

दिवाळीला सुरुवात झाली आहे. घरोघरी गोडाचे पदार्थ बनवले जातात. तसेच अनेक पाहुणे घरी येतात. पाहुणे मिठाई घेऊन येतात. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आल्या आहेत. या मिठाई खूप जास्त चविष्ट असतात. दरम्यान, एकदम स्वस्त मिठाईपासून ते लाखो रुपयांची मिठाई बाजारात मिळत आहेत. दरम्यान, दिवाळीत सर्वात महागडी मिठाई विकली जात आहे ज्याची किंमती प्रति किलो १ लाख रुपये आहे.

Most Expensive Mithai:
Railways Festival Offer: दिवाळी आणि सणासुदीच्या काळात ट्रेन तिकिटांवर मिळवा खास २०% सवलत

जयपूरमधील एका दुकानात ही मिठाई तयार केली जात आहे. या मिठाईचे नाव स्वर्ण प्रसादम असं आहे. या मिठाईची किंमत १.११ लाख रुपये प्रति किलो केली आहे.

स्वर्ण प्रसादम ही मिठाई खूप स्पेशल आहे. या मिठाईची चव तर उत्कृष्ट आहे. याचसोबत या मिठाईला वेगळा शाहीपण आहे. ही मिठाई बनवण्यासाठी पाइन नट्स, केशर आणि खऱ्या सोन्याचा वर्ख वापरला आहे.याचे सध्या फोटो सोशल मीडियावरव्हायरल होत आहे.

दरम्यान, या मिठाईला खास शुद्ध सोन्याचा लेप लावला आहे. यामुळे मिठाईला सोनेरी रंग आला आहे. ही मिठाई कोणत्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा कमी दिसत नाही. या मिठाईची किंमत ३००० रुपये प्रति तुकडा असेल. ही मिठाई १, ४ आणि ६ अशा पॅकेटमध्ये मिळणार आहे. या मिठाईसाठी खास दागिन्यासारखा एक कंटेनर दिला आहे. त्यामुळे हा फक्त गोड पदार्थ नव्हे तर एखादं गिफ्ट वाटतं.

Most Expensive Mithai:
Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, खात्यात किती रुपये जमा होणार?

जयपूरमधील या दुकाना अजून अनेक मिठाई आहेत. त्यातील एक म्हणजे स्वर्ण भस्म इंडिया. याची किंमत ८५,००० प्रति किलो आहे. सिल्व्हर भस्मा इंडिया मिठाईची किंमत ५८,००० रुपये आहे. या एकदम प्रिमियम क्वालिटीच्या मिठाई असतात. या मिठाईमध्ये ड्रायफ्रुट्स, अंजीर, ब्लूबेरी असे अनेक पदार्थ असतात.

Most Expensive Mithai:
Diwali Tips 2025: दिवाळीच्या रात्री करा 'हा' विशेष उपाय, घरात वर्षभर राहिल आर्थिक संपत्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com