Business Idea: कमी कालावधीत मालामाल व्हायचंय? 'हा' व्यवसाय करा अन् लाखो कमवा

Money Making Tips: आजकाल सर्वांना कमी कालावधीत जास्त पैसे कमवायचे असतात. आपण यासाठी नेहमी वेगवेगळे मार्ग शोधत असतो. असाच एक बिझनेस आपण जाणून घेऊ या.
Business Idea
Business IdeaYandex

Low Budget Business Idea

सध्या बहुतेक लोकांच्या नाश्त्यात ब्रेडचा वापर केला जातो. ब्रेडपासून अनेक प्रकारच्या वस्तू तयार करता येतात. ब्रेड सर्वत्र सहज उपलब्ध होत असल्यानं त्याची लोकप्रियताही जास्त आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही व्यवसाय (Business Idea) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ब्रेड बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. (marathi news)

चांगल्या मार्केटिंगद्वारे, तुम्ही तुमचा ब्रेड व्यवसाय खूप वेगाने वाढवू शकता आणि प्रचंड उत्पन्न मिळवू शकता. यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या स्थानिक बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा प्रणाली समजून घ्यावी (Bread Making Business) लागेल. तुम्ही घरबसल्या ब्रेड बनवणं सुरू करू शकता. त्याला जास्त वेळ लागत नाही. या व्यवसायात जास्त गुंतवणूकीचीही गरज नाही. लॉकडाऊननंतर ब्रेड खाणार्‍या लोकांची संख्या लक्षणीय वाढली आहे, याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फक्त दहा हजाराची गुंतवणूक

या व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीची गरज (Low Budget Business) आहे. ब्रेड बनवण्यासाठी गव्हाचं पीठ किंवा मैदा, मीठ, साखर, पाणी, बेकिंग पावडर, ड्राय फूड आणि मिल्क पाउडर हे साहित्य लागतं. तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यास, तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेचीही मदत घेऊ शकता.

ब्रेड बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुकानाची आवश्यकता नाही. तुम्ही घरातूनच सहजपणे हा व्यवसाय सुरू करता. ब्रेड तयार करण्यासाठी जास्त वेळही लागत (Money Making Tips) नाही. ब्रेड तयार करून, तुम्ही बेकरी किंवा बाजारात विक्री करुन चांगला नफा कमवू शकता. तुम्हाला या व्यवसायात जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.

Business Idea
Startup Business Idea : टी-शर्ट प्रिंटिंगच्या व्यवसायातून करा बक्कळ कमाई, जाणून घ्या सविस्तर

घरी तयार केलेल्या पदार्थांची मागणी

कोरोनाच्या भीषण काळानंतर आता लोकं स्वच्छ आणि आरोग्यदायी खाणं पसंत करत आहेत. यामुळे घरी तयार केलेल्या पदार्थांची (होममेड) मागणी वाढू लागली आहे. सध्या ग्रामीण भागातील बेकरी उद्योगामध्येही बेकरी उद्योग महत्त्वाचा (Low Budget Business Idea) आहे. भविष्यात त्याची मागणी अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. भारत बेकरी उत्पादनांसाठी एक प्रमुख उत्पादन घर आहे. अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरा सर्वात मोठा बिस्किट उत्पादक देश आहे.

भारतीय बेकरी क्षेत्रात ब्रेड, बिस्किट, केक यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात 17,000 कोटी रुपये आणि पुढील 3.4 वर्षांत 13.15 टक्क्यांच्या असाधारण दराने वाढ अपेक्षित (Utility News) आहे. वाढती शहरीकरण आणि डिस्पोजेबल उत्पन्न हे बेकरी उत्पादनांची मागणी वाढवणारे प्रमुख घटक आहेत.

Business Idea
Business Idea In Marathi: अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात सुरु करा व्यवसाय; होईल तगडी कमाई, जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com