Cheapest Car in India : तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही तुमची पहिलीच कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या बजेटमध्ये फिट बसेल. तसेच यात तुम्हाला हवी असलेली सर्व सुविधाही मिळेल.
आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत, ती आहे मारुती सुझुकी Alto K10. ही सर्वात बेस्ट एंट्री लेव्हल कार आहे. यात तुम्हाला अनेक चांगल्या फीचर्ससह सेफ्टी फीचर्सही मिळेल. ही कार दैनंदिन वापरासाठीही एक चांगला पर्याय आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Alto K10 ची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला याच्या बेस मॉडेलमध्ये अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतील. या कारमध्ये 4 लोक आरामात बसू शकतात. मात्र कंपनीचा दावा आहे की, यामध्ये 5 लोक बसू शकतात. यात चांगली बूट स्पेस मिळते. ही कार तरुणांमध्ये लोकप्रिय असून लहान कुटुंबासाठी बेस्ट आहे.
या कारमध्ये 1.0L K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 49KW पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल आणि AGS गिअरबॉक्सची सुविधा मिळेल. हे इंजिन चांगलं परफॉर्मन्स देतं, असं कंपनीचं म्हणणं आहे. Alto K10 पेट्रोल मॅन्युअलचे मायलेज 24.39 kmpl आहे.
याच्या पेट्रोल AMT चे मायलेज 24.90 kmpl आहे. तसेच Alto CNG मोडवर 33.85 km/kg मायलेज देते. Alto K10 ची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 27 लीटरची इंधन टाकी आणि 55 लीटरची सीएनजी टाकी आहे. कारमध्ये 13 इंच टायर आहेत. चांगल्या ब्रेकिंगसाठी यात डिस्क आणि ड्रम ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे.
Alto K10 मध्ये सुरक्षिततेसाठी अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, सीट बेल्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम सोबत EBD आणि एअरबॅग्ज आहेत. मारुती अल्टो K10 ही लहान कुटुंबासाठी बेस्ट कार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.