44,999 रुपये किंमत अन् 110km मायलेज, या आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स

Cheapest Bikes in India: या बातमीत आपण भारतातील सर्वत स्वस्त आणि बेस्ट मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
44,999 रुपये किंमत अन् 110km मायलेज, या आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स
TVS XL 100 Saam Tv
Published On

सध्या देशात एंट्री लेव्हल बाईक्सची खूप क्रेझ आहे. कारण आता कमी किमतीत बाजारात चांगले पर्याय उपलब्ध आहेत. इंजिन आधीच रिफाइन केले गेले आहेत, ज्यामुळे चांगले मायलेज मिळते. यातच जे लोक दररोज बाईकने लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी एंट्री लेव्हल बाईक हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्हीही अशाच बाईकच्या शोधात असाल, तर आम्ही तुम्हाला भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त आणि बेस्ट बाईकबद्दल माहिती सांगणार आहोत.

Honda Shine 100

या बाईकमध्ये ग्राहकांना 98.98 cc इंजिन मिळेल. जे 5.43 kW ची पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरते करते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ही बाईक एका लिटरमध्ये 65 किलोमीटर मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. यात पुढच्या आणि मागे ड्रम ब्रेक बसवलेले आहेत. या बाईकची किंमत 65,000 रुपये आहे. या बाईकची सीट मऊ आणि लांब आहे. ही कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे.

44,999 रुपये किंमत अन् 110km मायलेज, या आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स
Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Hero HF100

Hero MotoCorp ची HF100 ही भारत सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक आहे. कंपनीने लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंतच्या ग्राहकांना लक्षात घेऊन ही बाईक डिझाइन केली आहे. या बाईकमध्ये 100cc इंजिन आहे. जे 8.02 PS चा पॉवर देते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्ससह येते.

ही बाईक एक लिटरमध्ये 70 किलोमीटर मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. या बाईकची सीट आरामदायी आहे. बाईकमध्ये बसवलेले सस्पेन्शन एकदम सॉलिड आहे, ज्यामुळे खराब रस्त्यावर कोणतीही अडचण येत नाही. या बाईकची किंमत 56,318 रुपये आहे.

44,999 रुपये किंमत अन् 110km मायलेज, या आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स
Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

TVS XL 100

या सेगमेंटमधील सर्वत स्वस्त बाईक आहे TVS XL 100, ज्याची किंमत 44,990 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक कम मोपेड आहे. याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 99.7 cc 4 स्ट्रोक, इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानासह सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे 4.3 bhp पॉवर आणि 6.5 Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक एक लिटरमध्ये 80 किलोमीटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. तुम्ही ही बाईक दोन प्रकारे वापरू शकता. जर तुम्ही लहान व्यवसाय चालवत असाल आणि भरपूर सामान लोड करावे लागत असेल तर तुमच्यासाठी TVS XL 100 हा सर्वोत्तम पर्याय आहे. याचे कर्ब वजन 89 किलो आहे, तर पेलोड 130 किलो आहे. ही हेवी ड्युटी मशीन आहे. याचा टॉप स्पीड ताशी 60 किमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com