Bank Rule Update : बँकांनी केले ४ मोठे बदल; जाणून घ्या अन्यथा बसेल दंड, वाचा एका क्लिकवर

Bank Rule Update in marathi : आज बँकांनी ४ मोठे बदल केले आहेत. या नियमांची माहिती नसेल तर दंड बसण्याची शक्यता आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Bank Rule Update
bank rules Saam Tv
Published On

बँकेच्या नियमावलीत वेळोवेळी बदल होत असतात. फेब्रवारी महिन्यातही बँकेच्या नियमात मोठे बदल झाले आहेत. बँकेच्या बदलेल्या नियमाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. बँकेच्या नव्या ४ नियमांची माहिती नसेल तर दंड भरावा लागू शकतो. एटीएम ट्रांजेक्शन लिमिट ते बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कमेच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे.

काही बँकांनी बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कमेच्या नियमांमध्ये बदल केला आहे. एसबीआय खातेदारांना आता खात्यात कमीत कमी ५००० रुपयांची शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे. बँक खात्यात सुरुवातीला ३००० रुपयांची किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक होते. पंजाब नॅशनल बँक खात्याची किमान शिल्लक १००० रुपयांनी वाढवून ३५०० रुपये केली आहे. कॅनरा बँकेच्या खात्यात किमान शिल्लक १००० रुपयांनी वाढवून २५०० रुपये केली आहे. बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम नसेल तर खातेदारांना दंड भरावा लागणार आहे.

Bank Rule Update
Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; या पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

एटीएम ट्रांजेक्शनची नवी मर्यादा

फेब्रुवारी महिन्यात एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्या अपडेटनुसार, मेट्रो शहरात एटीएमधारकांना महिन्यातून ३ वेळा एटीएममधून पैसे काढणे मोफत आहे. त्यानंतर एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येकी ट्रांजेक्शन मागे २५ रुपये आकारले जाणार आहेत. याआधी २० रुपये आकारले जात होते. तुम्ही दुसऱ्यांदा पैसे काढल्यास ३० रुपये शुल्क आकारले जातील. नॉन-मेट्रो शहरात मर्यादा ५ रुपयांची लागू आहे.

Bank Rule Update
Bank Scam : दामदुप्पट रक्कमेसाठी बँकेत अफरातफर; बँक मॅनेजरसह नऊजण ताब्यात

ठेवींवर शुल्क

कोटक महिंद्रा बँकेने बचत खात्याच्या नियमात बदल केले आहेत. १०००० रुपयांहून अधिक रोख ठेवींसाठी प्रति १००० रुपयांसाठी प्रति महिना ५ रुपये शुल्क लागू होणार आहे. एटीएम डिक्लाइन फी आता नॉन-कोटक एटीएमसाठी २५ रुपये लागू होईल. स्टँडिंग इंस्ट्रक्शन फेलिअर फी २०० रुपयांमध्ये घट करून १०० रुपये केली आहे.

Bank Rule Update
Sangli DCC Bank : पाच सूतगिरण्यांची मालमत्ता विक्रीसाठी मागविल्या निविदा; थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची कारवाई

IDFC फर्स्ट क्रेडिट कार्ड

२० फेब्रुवारीपासून आयडीएफसी फर्स्ट कार्डमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. स्टेटमेंटच्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. CRED आणि PayTM सारख्या प्लॅटफॉर्मसाठी आता एज्युकेशन पेमेंटसाठी नवे शुल्क लागू होणार आहे. या व्यतिरिक्त कार्ड रिप्लेसमेंट फीमध्ये आता १९९ रुपये + कर भरावा लागणार आहे.

व्याजदरांवर ठेवा लक्ष

रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर रेपो रेटमध्ये कपात केली आहे. यामुळे बँकेचे कर्ज स्वस्त होणार आहे. तसेच मुदत ठेवीवरील व्याजदरातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रेपो रेटच्या आधारावर आरबीआय इतर बँकांना कर्ज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com