
बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या इंडियन बँकेत भरती सरु आहे. इंडियन बँकेत ऑथोराइज्ड डॉक्टर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत सविस्तर माहिती इंडियन बँकेच्या indianbank.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Indian Bank Recruitment)
इंडियन बँकेतील या भरतीसाठी इच्छुक उमेदवार २६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवाराला संबंधित क्षेत्रात कामाचा १० वर्षांचा अनुभव असायला हवा.
इंडियन बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग केली जाईल. त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.इंडियन बँकेतील या नोकरीसाठीचा अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर दिलेला आहे. हा फॉर्म भरुन तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
तुम्हाला हा फॉर्म चीफ मॅनेजर, इंडियन बँक, क्षेत्रीय कार्यालय, नंबर १, शालिवाहन रोज, मैसूर-५७००१० येथे पाठवायचा आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
इंडियन बँकेत तर नोकरीची सुवर्णसंधी आहे. याचसोबत तुम्ही गृह मंत्रलायातदेखील नोकरी मिळवू शकतात. गृह मंत्रालयात सध्या सिनियर कंसल्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. सेवानिवृत्ती सरकारी कर्मचारी किंवा एमबीए पदवीप्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराकडे १० वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.