Government Scheme: सरकारची नवी योजना! महिलांना मिळणार ₹१०,०००; या दिवशी खात्यात जमा होणार पैसे

Mahila Rojgar Yojana: बिहार सरकारने महिलांसाठी खास महिला रोजगार योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १०,००० रुपये मिळणार आहेत. येत्या १५ तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
Government Scheme
Government SchemeSaam Tv
Published On
Summary

सरकारची महिलांसाठी खास योजना

महिलांना मिळणार १०,००० रुपये

बिहारची महिला रोजगार योजना आहे तरी काय?

देशातील महिला या सशक्त व्हाव्यात म्हणून अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. केंद्रानंतर विविध राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी खास योजना राबवल्या आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. त्यानंतर आता बिहार सरकारनेदेखील महिलांसाठी खास महिला रोजगार योजना राबवली आहे.

Government Scheme
Central Govt Scheme: पहिल्या बाळाच्या जन्मावर ५०००, दुसऱ्यावेळी मुलगी झाली तर मिळतील ६ हजार रुपये; काय आहे सरकारची योजना?

बिहारच्या महिला रोजगार योजनेअंतर्गत सरकार महिलांना आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत महिला सशक्तिकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे. बिहारच्या या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर होतात. याचसोबत त्यांना रोजगाराच्या संधीदेखील मिळतात. या योजनेत सरकार महिलांच्या खात्यात १०,००० रुपये जमा करणार आहे.

या दिवशी येणार महिलांच्या खात्यात पैसे (Women will get 10,000 Rupees on these Date)

बिहार सरकारकडून राबवण्यात आलेल्या या योजनेत महिलांना पैसे दिले जाणार आहे. या योजनेत रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ७ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात १०,००० रुपये जमा केले जाणार आहे. सरकार या योजनेच्या अंबलबजावणीसाठी प्रयत्न करत आहे.

Government Scheme
Agriculture Livestock Scheme: आबा ऐकलं का! सरकार देणार गाई-म्हशी घेण्यासाठी अनुदान, जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

सरकारकडून मिळणाऱ्या या पैशातून महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात. स्वतः ला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करु शकतात.

या योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. या योजनेसाठी शहरी महिला ऑनलाइन अर्ज करु शकतात. तर ग्रामीण भागातील महिला संकुल स्तरीय संघात जाऊन अर्ज करु शकतात.या योजनेसाठी अर्ज स्विकारल्यानंतर पैसे जमा केले जाणार आहेत.

Government Scheme
Government Scheme: प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला १० हजार रूपये, लाडकीसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com