Ration Card : केशरी रेशन कार्ड काढायचंय? उत्पन्न मर्यादा किती अन् काय कागदपत्र लागणार? वाचा एका क्लिकवर

Orange Ration Card : महाराष्ट्रातील केशरी रेशन कार्डासाठी नवीन पात्रता निकष जाणून घ्या. उत्पन्न मर्यादा, आवश्यक कागदपत्रे, अर्जासाठीच्या अटी आणि सरकारी योजनांसाठी रेशन कार्डाचे महत्त्व येथे सविस्तर समजून घ्या.
Ration Card New Rules 2026
Ration Card New Rules 2026meta ai
Published On

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी रेशन कार्ड हे फक्त अन्नधान्या मिळवण्याचं साधन नसून विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा पुरावा मानला जातो. १ मे २०२६ पासून लागू झालेल्या नव्या नियमांनुसार रेशन कार्डाच्या पात्रता निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे केशरी रेशन कार्ड मिळवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात, याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.

महाराष्ट्रात रेशन कार्डांचं वर्गीकरण कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर केलं जातं. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, अशा कुटुंबांना पिवळं रेशन कार्ड दिलं जातं. तर ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या नावावर चारचाकी वाहन नाही, अशा कुटुंबांना केशरी रेशन कार्ड मिळू शकतं.

Ration Card New Rules 2026
Bank Holiday: पुढील 10 दिवसांत 6 दिवस बँका बंद; कोणत्या राज्यात कधी? वाचा तारीख

केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य मिळत नाही. मात्र हे कार्ड ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून विविध शासकीय कामांसाठी फायदेशीर ठरतं. तसेच अनेक सरकारी योजनांसाठी अर्ज करताना रेशन कार्ड महत्त्वाचा पुरावा म्हणून स्वीकारला जातो. याशिवाय, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांपर्यंत आहे, त्यांना प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत स्वस्त दरात धान्य मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Ration Card New Rules 2026
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; २४, २२ कॅरेटचे ताजे दर

केशरी रेशन कार्डासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र

वीज बिल, पाणी बिल किंवा भाडे करार

तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला

कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो

जुने रेशन कार्ड असल्यावर नाव कमी केल्याचा दाखला

बँक पासबुकची झेरॉक्स

अर्ज करण्याआधी लक्षात ठेवा

अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरुपी रहिवासी असणं आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपडेट आणि अचूक केलेली असावीत. चुकीची माहिती दिल्याने अर्ज फेटाळला जाऊ शकतो. केशरी रेशन कार्ड हे सवलतीच्या धान्यासाठी नसलं तरी विविध शासकीय सुविधा आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करणे गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com