

महाराष्ट्र सरकारचा फ्लॅट मालकांसाठी मोठा निर्णय
प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड
मालकी हक्क आणि जमीन नोंदींमध्ये स्पष्टता
महाराष्ट्र सरकार सदनिका मालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सदनिका मालकांसाठी एक व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. या कार्डमुळे सदनिका मालकाचे नाव जमिनीच्या नोंदींमध्ये समाविष्ट असते. दरम्यान असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकता वाढणार आहे. हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हे पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित असणार आहे.
नव्या नियमांनुसार, आता जमिनीचाच नाही तर त्या जमिनीवर बांधलेल्या प्रत्येक फ्लॅटचा सरकारी दप्तरी नोंदी असणार आहे. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हे महाराष्ट्र शासनाने जारी केलेले कायदेशीर दस्तऐवज आहे. यातून अपार्टमेंट किंवा फ्लॅट मालकांना त्यांच्या इमारतीखालील जमिनीवरील त्यांच्या मालकी हक्काची स्पष्ट माहिती मिळत असते.
या कार्डवर इमारतीचे क्षेत्रफळ, तसेच प्रत्येक फ्लॅट मालकाचा वाटा नोंदवला जातो. यामुळे बहुमजली इमारतींमधील मालकी हक्कांशी संबंधित गुंतागुंत सोपी होणार आहे. सदनिका (फ्लॅट), इमारती आणि व्यावसायिक संकुलांचा अधिकृत डेटाबेस तयार करण्यासाठी मंत्रिमंडळाने 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' नियमांना मंजुरी दिली आहे.
सध्या राज्यातील शहरी भागात सुमारे ५६ लाख मालमत्ता कार्ड आहेत, तर ग्रामीण भागात अडीच कोटी ७/१२ उतारे आहेत. या नियमांनुसार प्रत्येक फ्लॅटधारकाला स्वतंत्र 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' दिले जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरही फ्लॅटधारकाचे नाव नोंदवले जाणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेमुळे फ्लॅट मालकांचे मालकी हक्क सिद्ध करणं सोपं होईल. आधी फ्लॅट मालकांना जमिनीवर मालकी हक्क नसायची, केवळ हिस्सेदारी प्रमाणपत्र असायचे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आता फ्लॅट मालकाचे नाव भूमी अभिलेखांमध्ये नोंदवले जाणार आहे. इमारतीच्या जमिनीमध्ये संबंधित फ्लॅटधारकाचा हिस्सा किती आहे, याची अधिकृत नोंद आता केली जाणार आहे. ते गट क्रमांक ५७४/२, हिस्सा १/१२० अशा स्वरूपात हा मालकी हक्क अशा प्रकारे नोंदवला जाणार आहे. या कार्डमुळे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांतील लाखो फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मालमत्तेवरील हक्क अधिक स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.