LPG Cylinder Booking Rule : गॅस सिलिंडर बुकिंगचा नियम पुन्हा बदलला; आता दुसरा सिलिंडर किती दिवसांनी बुक करता येणार?

LPG Cylinder Booking Rules Change : केंद्र सरकारनं ग्रामीण भागासाठी एलपीजी गॅस सिलिंडर रिफिल बुकिंगच्या नियमांत मोठा बदल केला आहे. आता ग्रामीण भागातील ग्राहकही शहरांप्रमाणे ४५ दिवसांऐवजी २५ दिवसांच्या अंतराने दुसरा गॅस सिलिंडर बुक करू शकणार आहेत.
घरगुती गॅस सिलिंडर आता २५ दिवसांत बुक करता येणार, ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा
घरगुती गॅस सिलिंडर आता २५ दिवसांत बुक करता येणार, ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासाsaam tv
Published On

second LPG cylinder can be booked after 25 days : ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी (LPG) ग्राहकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. आता ग्रामीण भागातील लोकांना दुसरा गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ४५ दिवसांची वाट बघावी लागणार नाही. सरकारनं ग्रामीण भागातील एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी कमी करून २५ दिवसांवर आणला आहे. यासोबतच आता शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी बुकिंगचा नियम एकसारखाच झाला आहे. पुरवठ्याची स्थिती सुधारल्याने आणि बॅकलॉग कमी झाल्यानंतर पेट्रोलियम मंत्रालयानं तेल कंपन्यांना तातडीने नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी दिली माहिती

केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सोशल मीडियावर या निर्णयाबाबत माहिती दिली. आखाती देशांत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. पुरवठा मर्यादित आणि गॅस टंचाई भासू नये यासाठी त्यावेळी शहरांमध्ये २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांचा बुकिंगचा कालावधी निश्चित करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

पुरवठ्यात सुधारणा, बंदी उठली

आता देशात एलपीजी पुरवठ्याची स्थिती सामान्य आणि उत्तम झाली आहे. सिलिंडरचा जुना बॅकलॉगही मोठ्या प्रमाणात संपला आहे. हे लक्षात घेऊन सरकारने ग्रामीण भागासाठी लागू केलेला नियम बदलला आहे. आता शहर असो किंवा ग्रामीण भाग, त्या ठिकाणी पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर २५ दिवसांनीच दुसरा रिफिल बुक करू शकतो.

घरगुती गॅस सिलिंडर आता २५ दिवसांत बुक करता येणार, ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा
जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

नवीन नियम तातडीने लागू होणार

पेट्रोलियम मंत्रालयानं सरकारी तेल विपणन कंपन्यांना पाठवलेले अधिकृत पत्रही केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केले आहे. मंत्रालयाने सर्व तेल कंपन्यांना या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा त्वरित फायदा मिळू शकेल. सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील आणि मोठ्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडर आता २५ दिवसांत बुक करता येणार, ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा
एका दिवसात किती वेळा ट्रॅफिक चालान आकारलं जातं? काय आहे नियम जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com