LPG संकटावर सरकारचं मोठं विधान, पर्याय शोधण्याचा जनतेलाच दिला सल्ला

LPG Shortage in India: जागतिक संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे एलपीजीबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सरकारने नागरिकांना गॅसचा जबाबदारीने वापर करण्याचा आणि पर्यायी इंधनाचे पर्याय शोधण्याचा सल्ला दिला आहे.
LPG Shortage in India:
LPG cylinders in demand as global tensions impact gas supply and raise concerns across India.Saam TV Marathi
Published On
Summary
  • पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम

  • होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकाबंदीमुळे संकट वाढले

  • सरकारकडून पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला

इस्रायल-इराण आणि अमेरिकेच्या युद्ध वीस दिवसापासून चालू आहे. पश्चिम आशियातील युद्ध अजून जास्त चिघळण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रालयच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनी नाकाबंदी केली आहे. कच्चे तेल आणि गॅस वाहून नेणाऱ्या जहाजांना तेथून जाण्यास परवानगी इऱान देत नाहीये.

LPG Shortage in India:
LPG Crisis: जगातील सर्वात मोठ्या LNG सेंटरवर हल्ला; गॅस पुरवठ्यावर मोठं संकट, भारतात LPG सिलेंडर महागणार?

इराणच्या या कारवाईमुळे भारतासह जगभरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात तर एलपीजीची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक हैरना झाले आहेत. याच दरम्यान पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी एलपीजीच्या परिस्थितीवर मोठं विधान केले आहे. सुजाता शर्मा यांनी देशातील जनतेला त्यांच्याच परीने इंधनाचा पर्यायी मार्ग शोधण्यास सांगितले आहे.

LPG Shortage in India:
LPG Cylinder Booking: एलपीजी गॅस बुकिंग कसा करायचा? HP, Indane आणि भारत गॅसची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सरकारचे म्हणणे आहे की, घरगुती ग्राहकांना १००टक्के एलपीजीचा पुरवठा होत आहे. परिस्थिती चिंताजनक आहे. घाबरून केलेले बुकिंग कमी झाले आहे, परंतु लोकांनी अफवांकडे दुर्लक्ष करत गरज असेल तरच गॅस सिलिंडरचे बुकिंग करावे असं आवाहन सरकारकडून सुजाता शर्मा यांनी केले आहे. एलपीजीची परिस्थिती गंभीर आहे. पुरवठा कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

परंतु जनतेने पर्यायी इंधनाचा विचार करावा. त्यांनी घाबरून खरेदी करणे टाळावे, असेही आवाहन सुजाता शर्मा यांनी केले आहे. सरकार काळाबाजार आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यात ४५०० पेक्षा जास्त छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.

सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यात भर दिला आहे. सध्ंया घरगुती गॅसचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत पोहोचलाय. यामुळे एलपीजीच्या आयातावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान राकेश सिन्हा यांनी सांगितले की, आखाती देशात भारताचे २२ जहाज आणि खलासी सुरक्षित आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी ओमान आणि कतारसह अनेक आखाती देशांशी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासारख्या जागतिक नेत्यांशी चर्चा केली आहे. राजनैतिक तोडगा काढण्याच्या गरजेवर भर दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com