Aadhar Card : आधार कार्ड हरवलंय? काळजी करू नका! मोबाईलवरून घरबसल्या काही मिनिटांत e-Aadhaar करा डाउनलोड

E-Aadhar Card Update News : आधार कार्ड हरवलंय? मोबाईलवरून UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर e-Aadhaar कसं डाउनलोड करायचं, OTP पडताळणी कशी करायची आणि PDF पासवर्ड काय असतो, जाणून घ्या सोप्या स्टेप्समध्ये.
Aadhar Card Downlod Online News
Aadhar Card Downlod Online NewsAI Image
Published On: 
Summary
  • आधार कार्ड हरवल्यास e-Aadhaar ऑनलाइन डाउनलोड करता येते

  • UIDAI च्या अधिकृत myAadhaar पोर्टलवरून डाउनलोड करता येते

  • आधार क्रमांक, EID किंवा VID वापरून डाउनलोड प्रक्रिया करता येते

आधार कार्डची मूळ प्रत हरवली असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीने आधार कार्डची गरज असेल, तर आता आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. कारण UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही घरबसल्या आधार कार्डची डिजिटल प्रिंट म्हणजेच e-Aadhaar डाउनलोड करू शकता. ही प्रिंट PDF स्वरूपात मिळते. मात्र, त्यासाठी आधारशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक उपलब्ध असणे आवश्यक आहे.

मोबाईलवरून e-Aadhaar डाउनलोड कसं करायचं?

आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही काही मिनिटांत आधारची डिजिटल प्रत मिळवू शकता.

१. अधिकृत वेबसाइट उघडा: सर्वप्रथम मोबाईलमधील ब्राउझरवर myAadhaar Portal ही UIDAI ची अधिकृत वेबसाइट उघडा.

२. Download Aadhaar पर्याय निवडा: वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ‘Download Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.

३. आवश्यक माहिती भरा: आधार क्रमांक (Aadhaar Number), नोंदणी क्रमांक (Enrolment ID) किंवा व्हर्च्युअल आयडी (VID) यांपैकी योग्य पर्याय निवडा. त्यानंतर संबंधित माहिती भरा.

४. OTP द्वारे पडताळणी करा: ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा. आधारशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.

५. PDF डाउनलोड करा: पडताळणी यशस्वी झाल्यानंतर e-Aadhaar डाउनलोड करा आणि मोबाईलमध्ये सुरक्षितपणे सेव्ह करा.

Aadhar Card Downlod Online News
Sleep Health : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

e-Aadhaar PDF चा पासवर्ड काय असतो?

डाउनलोड केलेली PDF फाइल उघडताना पासवर्ड विचारला जाऊ शकतो. हा पासवर्ड तयार करण्यासाठी आधार कार्डवरील नावाची पहिली चार इंग्रजी अक्षरे कॅपिटलमध्ये आणि जन्मवर्ष एकत्र लिहावे लागते. उदाहरणार्थ, नाव RAHUL आणि जन्मवर्ष 1998 असल्यास पासवर्ड RAHU1998 असा असेल.

Aadhar Card Downlod Online News
Potato Peels : बटाटा सोलून साली फेकून देता? 'असा' करा वापर, ८ दिवसांत दिसेल चमत्कार

e-Aadhaar वापरणं सुरक्षित आहे का?

UIDAI ने दिलेले डिजिटल सहीसह जारी केलेले e-Aadhaar हे वैध मानले जाते. आवश्यकतेनुसार त्याची प्रिंटही काढता येते. मात्र, आधार क्रमांक, OTP आणि PDF पासवर्ड अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नका. आधार डाउनलोड करण्यासाठी नेहमी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटचाच वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com