Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार; १, ०१,००० रुपयांपर्यंत मिळणार लाभ, काय कराव लागेल

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थी मुलींना मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार असून १ एप्रिल २०२३ पासून १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करण्यात येणार आहेत.
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार;  १, ०१,००० रुपयांपर्यंत मिळणार लाभ, काय कराव लागेल
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार; १, ०१,००० रुपयांपर्यंत मिळणार लाभ, काय कराव लागेलmeta ai
Published On

महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. बालविवाह रोखणे, मुलींना सुशिक्षित करणे, कुपोषण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. समोर आलेल्या नव्या अपडेटनुसार या योजनेची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील अनेक मुलींना याचा लाभ घेता येणार आहे.

लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलव्दारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याशिवाय अर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची संख्या देखील कमी होणार आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार;  १, ०१,००० रुपयांपर्यंत मिळणार लाभ, काय कराव लागेल
शिवसेना खासदाराच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, Video Viral

या प्रक्रिया होणार सुलभ

मुलीच्या जन्मानंतर पोर्टलवर नोंदणी आणि अर्ज करणे अत्यावश्यक राहणार आहे. तसेच नवीन सुलभ प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटो फेच होणार आहे. या सोबतच आई वडिलांची केवायसी जोडली जाणार आहे. या सर्व सुविधांमुळे नागरिकांचा कागदपत्रांसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच या योजनेसंबंधी इतर लाभ घेण्यासाठी वारंवार अर्ज करण्याची गरज देखील भासणार नाही. नागरिकांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना १ एप्रिल २०२३ पासून १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करण्यात येणार आहेत.

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार;  १, ०१,००० रुपयांपर्यंत मिळणार लाभ, काय कराव लागेल
सोलापूर-दौंड-कलबुर्गि प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता रोज धावणार ट्रेन, कधी, कुठे थांबणार? पाहा गाड्यांचं पूर्ण वेळापत्रक

या सुलभ पारदर्शक सुविधा आणि जलद अर्ज प्रक्रियेमुळे अधिकाधिक पात्र खेड्यापाड्यातील लाभार्थी मुलींना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.अशी माहिती माहिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

वयानुसार मुलींना मिळणार इतके पैसे

१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजने अंतर्गत जन्मांतर ५००० रू, पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६००० रु. सहावीत प्रवेश घेतल्यानंतर ७००० तर अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८००० आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० असा एकूण पाच विविध टप्प्यांमध्ये १,०१,००० रूपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे.

अट काय

कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे. याशिवाय शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न व इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे .

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com