

Stock Market Prediction Today: गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. BSE सेन्सेक्स ५४२ अंकांनी घसरला आहे. तर जागतिक बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांनी आपले भांडवल काढल्याने बाजारात मंदी कायम राहिली. (Latest Stock Market Prediction News)
बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ५४२.१० अंकांनी म्हणजेच ०.८२ टक्क्यांनी घसरून ६५,२४०.६८ अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ८१९.७ अंकांवर खाली गेला होता. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी देखील १४४.९० अंकांनी म्हणजेच ०.७४ टक्क्यांनी घसरून १९,३८१.६५ अंकांवर बंद झाला आहे.
सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये टायटन दोन टक्क्यांनी खाली घसरला होता.याशिवाय बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फायनान्स यांचेही नुकसान झाले आहे.
या शेअरर्समध्ये झाली वाढ
इंडियन हॉटेल्स, मेघमणी फिनकेमवर, मोमेंटम इंडिकेटर मूव्हिंग अॅव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स (MACD) लॉरस लॅब्स, बालाजी अमाईन्स आणि शॉपर्स स्टॉप यांमध्ये तेजीचा कल दिसत आहे.
या शेअर्समध्ये दिसतेय मंदी
सीई इन्फोसिस्टम्स, श्याम मेटलिक्सवर, त्रिवेणी अभियांत्रिकी, केईसी इंटरनॅशनल, सीएसबी बँक यांमध्ये मंदीची चिन्हे दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.