Share Market Closing: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटींचे नुकसान...
Share Market Closing Update in Marathi:
आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. फिचने अमेरिकेचे रेटिंग कमी केली आहे. 2011 नंतर कोणत्याही एजन्सीने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे रेटिंग कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुधवारी याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. स्थानिक शेअर बाजारही तोट्याने उघडले.
जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा त्यात आणखी घट झाली. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) जवळपास 1,000 अंकांनी घसरला आणि 66,500 च्या खाली गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NSE) देखील 19,5000 च्या खाली गेला.
दुपारी 2.15 वाजता सेन्सेक्स 970.25 अंकांनी म्हणजेच 1.46 टक्क्यांनी घसरून 65,489.06 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीही 303.60 अंकांनी म्हणजेच 1.54 टक्क्यांनी घसरून 19,429.95 वर होता. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)
सर्वात मोठी घसरण बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये झाली आहे. टाटा स्टील, टाटा मोटर्स, हिरो मोटो, आयशर मोटर्स आणि कोल इंडियाचे शेअर्स दोन टक्क्यांहून अधिक घसरले. रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्सही प्रत्येकी 1.5 टक्क्यांनी घसरले.
सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स घसरत आहेत. दक्षिण कोरियाचे कॉस्पी, जपानचे निक्केई, चीनचे शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचे हँगसेंग इतर आशियाई बाजारांमध्ये घसरले. मंगळवारी अमेरिकेचे बाजार घसरणीसह बंद झाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.