LGP Gas Accident Insurance: गॅस सिलिंडरचा अपघात झाला तर मिळेल ५० लाख रुपये, जाणून घ्या कसं करायचं क्लेम...

LPG Gas: गॅस सिलिंडरचा अपघात झाला तर मिळेल ५० लाख रुपये, जाणून घ्या कसं करायचं क्लेम...
LGP Gas Accident Insurance
LGP Gas Accident InsuranceSaam Tv
Published On

LGP Gas Accident Insurance Information in Marathi:

आताच्या काळात सर्वजण स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरत करतात. याशिवाय भारत सरकार देशातील ग्रामीण आणि सीमांत भागातील प्रत्येक घरात एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देखील चालवत आहे. आधी देशात अनेक महिलांना चुलीत लाकूड टाकून अन्न शिजवावे लागत होतं. अशा परिस्थितीत त्यांचे हात भाजण्याचा धोका खूप जास्त होता. (Utility News in Marathi)

याशिवाय स्वयंपाकाच्या या प्रक्रियेत धुराचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत होता. मात्र आता प्रत्येक घरात एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचत आहेत. अशातच स्वयंपाक करणे खूप सोयीचे झाले आहे. एलपीजी गॅस सिलिंडरने स्वयंपाक करणे जितके सोयीचे आहे तितकेच ते धोकादायक आहे. एलपीजी एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील.

LGP Gas Accident Insurance
DSP Salary in Maharashtra: पोलिस उपअधीक्षक झाल्यानंतर किती मिळतो पगार, कोणत्या मिळतात सुविधा? जाणून घ्या...

त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे का की गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास गॅस कंपन्यांकडून विम्याची सुविधाही दिली जाते. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत. (Latest Marathi News)

जेव्हा तुम्हाला नवीन एलपीगी गॅस कनेक्शन मिळेल. त्यासोबत तुम्हाला वैयक्तिक अपघात कवच देखील दिले जाते. नवीन एलपीजी गॅस कनेक्शनसह येणाऱ्या वैयक्तिक अपघात कव्हरबद्दल अनेकांना माहिती नसते.

LGP Gas Accident Insurance
Shaikshanik Karj Yojana: परदेशात शिक्षण घ्यायचं आहे? महाराष्ट्र सरकार देतेय 20 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे योजना...

गॅसचा स्फोट किंवा गळती झाल्यामुळे आग लागल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत या कव्हरमध्ये 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. गॅस सिलिंडरमुळे झालेल्या अपघातासाठी जास्तीत जास्त 50 लाख रुपये दिले जातात. यामध्ये प्रति व्यक्ती कमाल 10 लाख रुपये, त्याचबरोबर अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाते.

एवढेच नाही तर अपघातात तात्काळ मदत म्हणून प्रति व्यक्ती 25 हजार रुपये दिले जातात. याशिवाय मालमत्तेच्या नुकसानीसाठी एक लाख रुपयांची भरपाईही दिली जाते. एलपीजी गॅस सिलिंडरच्या वैयक्तिक अपघात विम्याचा दावा करण्यासाठी, तुम्हाला अपघातानंतर गॅस डीलरला कळवावे लागेल. याशिवाय पोलिसात जाऊन तक्रार करावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com