Share Market News : MRF कंपनीच्या शेअरने रचला इतिहास! एक शेअर 1 लाख रुपयांवर; MRFचे शेअर एवढे महाग का?

MRF Share Price News : एमआरफ कंपनी शेअर प्राईजमध्ये 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली कंपनी बनली आहे.
MRF
MRF Saam TV
Published On

MRF Share Price : टायर कंपनी MRPच्या शेअर्सने मंगळवारी नवा इतिहास रचला. MRF कंपनीच्या शेअरच्या किमतीने आज एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. एमआरफ कंपनी शेअर प्राईजमध्ये 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली कंपनी बनली आहे.

आज BSEवर एमआरएफच्या शेअरची किंमत 1.37 टक्क्यांच्या उसळीसह 1,00,300 रुपयांवर पोहोचली. एमआरएफच्या शेअरची किंमती मे महिन्यातही एक लाख रुपयांच्या जवळ पोहोचली होती.

MRF
Fixed Deposit Rate : गुंतवणूकीची चिंता सतावतेय ? या टॉप 5 खाजगी बँकांकडून एफडीवर मिळतेय तगडे रिटर्न

MRF स्टॉक हा भारतातील सर्वात महाग शेअर आहे. या यादीत Honeywell Automation दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 41,152 रुपये आहे. यानंतर Page Industries, Shree Cement, 3M India, Nestle India आणि Boschचे शेअर सर्वाधिक महाग आहेत. (Latest Marathi News)

MRF
Farmer Thar Viral Video : भावा तुझीच हवा, नांगराला जुंपली 20 लाखांची थार अन् भुसभुशीत केलं शिवार

MRFचा शेअर एवढा महाग का?

स्टॉक स्प्लिटमुळे कोणत्याही स्टॉकची किंमत कमी होत असते. परंतु एमआरएफने आतापर्यंत आपले शेअर स्पिट केलेले नाही. कंपनीचे एकूण 42,41,143 शेअर्स आहेत. यापैकी 30,60,312 शेअर्स पब्लिस शेअरहोल्डर्सकडे आहेत. गेल्या तीन महिन्यांत या शेअरच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com