Highest FD Rates : आपल्यापैकी अनेक एफडी करण्याची सवय असते. पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक झाल्यास त्यावर मिळणारी रक्कम देखील चांगली. त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या गुंतवणूक करतो त्यातील एक एफडी.
बँकेत साठवून ठेवलेल्या पैशांवर योग्य तो व्याजदर मिळावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे आपण त्यासाठी शोधतो ती एखादी सरकारी बँक. आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की खाजगी बँकेतून योग्य तो व्याजदर मिळत नाही.
परंतु, आरबीआयच्या नव्या योजनेनुसार आता खाजगी बँकादेखील आपल्या गुंतवणूक केल्यास चांगले व्याजदर मिळेल अशी खात्री देताय. तुमचे देखील खाजगी बँक खाते असेल तर काय आहे नवीन योजना व कोणत्या आहेत टॉप 5 खाजगी बँका जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर.
रिझर्व्ह बँक (Bank) ऑफ इंडियाने ८ जून 2023 रोजी नव्या आर्थिक धोरणांची घोषणा केली. महागाई आटोक्यात येत असल्यामुळे केंद्रीय बँकेने यावेळी रेपो दरात कोणतेही बदल केले नाहीत. तरी, आर्थिक धोरणांच्या घोषणेनंतर बँकांच्या एफडी व कर्जांच्या व्याजदरातील बदल सामान्य करण्यात आले आहेत. बँका साधारणतः ७ दिवसांच्या कालावधीपासून १० वर्षांच्या कालावधीपर्यंत एफडी योजनेत गुंतवणूक (Investment) करण्याची परवानगी देतात. या नव्या योजनेनुसार तुम्हाला आता एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक या टॉप ५ खाजगी बँकांकडून एफडीवर उत्तम व्याजदर मिळणार आहे.
खाजगी बँका आणि त्यांचे एफडी व्याजदर
खाजगी बँकांमध्ये ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडीत गुंतवणूक करण्याची परवानगी देतात.
1. HDFC Bank : देशातील (World) सर्वात मोठ्या खाजगी बँकेत एफडीवर ३ पासून ७.२५ टक्के व्याजदर मिळते. ४ वर्ष ७ महिन्यांच्या एफडीवर ७.२५ टक्क्यांचे सर्वाधिक व्याज दिले जाते. त्याचबरोबर १० वर्षांच्या कालावधीपर्यंतच्या एफडीवर चांगले व्याज मिळते. जेष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक ७.७५ टक्के इतके व्याज दिले जाते.
2. ICICI Bank : आयसीआयसीआय बँक एफडीवर ३ ते ७.१० टक्के व्याज देते. या बँकेत सर्वाधिक व्याज १५ वर्षांपेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी उपलब्ध आहे. जेष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांपेक्षा ०.५० टक्के अधिक व्याज मिळते.
3. Axis Bank : खाजगी क्षोत्रातील आणखी एक बँक म्हणजे अॅक्सिस बँक. या बँकेत एफडीवर ३.५० टक्के ते ७.१० टक्के व्याज १३ महिन्यांपासून दीड वर्षांपर्यत १८ महिन्यांपेक्षा कमी कालवधीच्या एफडीवर देण्यात येते. जेष्ठ नागरिकांसाठी ०.५० टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. १८ मे पासून हे नवे दर कायम आहेत.
4. Yes Bank : येस बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर ३.२५ टक्के ते ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज देऊ करते. तर जेष्ठ नागरिकांना यापेक्षा जास्त म्हणजेच ०.५० टक्के व्याज मिळते. या बँकेत १८ महिन्यांपेक्षा जास्त आणि ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज मिळते.
5. Kotak Mahindra Bank : या बँकेतील एफडीवर २.७५ टक्क्यांपासून ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. ही बँक ३९० दिवस किंवा २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडी योजनांवर सर्वाधिक व्याज देते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.