Petrol Diesel Rate (6th May 2024): पेट्रोल-डिझेल दरात घट? जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price Today: सध्या महाराष्ट्रासह विविध भागात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईपासून दिलासा मिळावा हीच अपेक्षा निवडणुकीच्या काळात करत आहे.
Petrol Diesel Rate (6th May 2024)
Petrol Diesel Rate (6th May 2024)Saam Tv

सध्या महाराष्ट्रासह विविध भागात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वाढत्या महागाईपासून दिलासा मिळावा हीच अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. महागाईचे नाव काढताच अनेकदा समोर येते ते म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे सर्व जण विविध ठिकाणी फिरण्याचा प्लान करत आहेत.

Petrol Diesel Rate (6th May 2024)
Smart Businesses Ideas: घरबसल्या होईल बम्पर कमाई; कमी बजेटमध्ये करता येणारे व्यवसाय

घरातून वाहन घेऊन जाण्याआधी पेट्रोल-डिझेलच्या किंमती माहिती असणे गरजेचे असते. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत थोड्या जरी चढ- उतार झाला तरी सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटमध्ये फरक पडतो. तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीय तेल कंपन्यांनी ६ मे रोजीच्या कच्च्या तेलाच्या किंमती सकाळी ६ वाजताच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार तुमच्या शहरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या ते जाणून घेऊ.

आजच्या तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीसा बदल झालेला आहे. तर कोलकत्ता ,मुंबई आणि चैन्नई , दिल्ली या प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत.

महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किमती

आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.१५ रुपये इतके आहे.कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे.त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.९८ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.५६ रुपये (Price) प्रति लिटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल १०३.७६रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.२९ रुपये/ प्रति लिट

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.४३ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.९५ रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल १०४.०६ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.६२ रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल १०४.९४ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१. ४४रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate (6th May 2024)
Business सुरू करण्यासाठी MSME मध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे का? काय आहेत फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com