ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर पुढील ३ आठवडे सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पडझड सुरुच आहे.
मागच्या सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव घसरले होते. मागील महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकाची पातळी गाठली होती. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. आज सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे जाणून घेऊया.
1. आजचा सोन्याचा भाव
बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार काल 24 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)58,680 रुपये तर आज 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 58,790 रुपये मोजावे लागणार आहेत.
2. चांदीचा भाव
बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार काल चांदीसाठी 73,860 रुपये प्रति किलो मोजावी लागली आहे. तर आजही चांदी प्रति किलो 73,840 रुपयांनी विकली जात आहे.
3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची (Gold किंमत ५८,७९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ५८,७९० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,७९० रुपये इतका असेल.
4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?
सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.